anil patil esakal
जळगाव

Jalgaon Anil Patil : दंगली घडविण्याचे भाजपचे तंत्र : आमदार अनिल पाटील

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Anil Patil : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आहेत. (MLA Anil Patil statement about BJP technique of creating riots jalgaon news)

असे असले, तरी दोघांनी कोणा अधिकाऱ्याला फोन केल्यास त्यांचे कोणताही अधिकारी ऐकत नसल्याचा आरोप आमदार अनिल पाटील यांनी आंदेालनानंतर पत्रकारांशी बोलताना केला.

मंत्री पाटील, मंत्री महाजन राज्य चालविणाऱ्यांच्या जवळची असली, तरी जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. अमळनेरला दोन गटांत झालेल्या हाणामारीला दंगलीचे स्वरूप देत संचारबंदी लावली.

मात्र, एकही मंत्री त्याठिकाणी आला नाही. दोघांची मंत्रिपदे काढून नागरिकांचे कामे करणाऱ्या आमदार राजूमामा भोळे, आमदार संजय सावकारे यांना मंत्री करावे, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दंगली घडविण्याचे भाजपचे तंत्र

लवकरच लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे दोन समाजांत तेढ निर्माण करून दंगली घडवायच्या व आपली राजकीय पोळी भाजून घ्यावयाची, हे भाजपचे तंत्र असल्याचा आरोपही आमदार पाटील यांना केला.

दिल्लीपासून हे तंत्र वापरले जात आहे. दोन समाजांत तेढ निर्माण करून सामाजिक शांततेचा भंग केला जात आहे. राज्यात, देशात सत्ता कोणाचीही असेना. मात्र, दोन समाजांत तेढ निर्माण करून वातावरण गढूळ करू नये, असे मला वाटत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : हांडेवाडीमध्ये टायर साठ्याच्या शेडला भीषण आग

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

Sangli Girl : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर दमदाटीने दोघांचे शारिरीक संबंध, आणखी दोघांनी त्याच मुलीवर केला विनयभंग; पोलिस म्हणतात...

SCROLL FOR NEXT