Road construction esakal
जळगाव

MLA Bhole to PWD : 38 कोटींतील रस्त्याची कामे तातडीने करा; बांधकाम विभागाला आदेश

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शासनाने शहरातील ३८ रस्त्यांच्या कामांसाठी ३८ कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्यातील ज्या रस्त्याची कामे राहिली आहेत, ती तातडीने पूर्ण करावीत, असे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार राजूमामा भोळे यांनी दिले आहेत, तर शासनाने शहरातील रस्त्यासाठी शंभर कोटींचा निधी मंजूर केला आहे. (MLA Bhole ordered officials of pwd to complete road works immediately jalgaon news)

या निधीतून रस्त्याची कॉंक्रिटची कामे करण्याबाबत महापाकिलेतील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घ्यावी, असे पत्र आमदार सुरेश भोळे यांनी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना दिले आहे.

याबाबत आमदार भोळे यांनी सांगितले, की शहरातील रस्त्यांच्या कामासाठी शासनाने ३८ कोटींचा निधी दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ही कामे होत आहे. मात्र, काही रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत.

अद्यापही मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे बाकी आहेत. या रस्त्यांची कामे तातडीने करावीत, यासाठी आपण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी गिरीश सूर्यवंशी यांच्याशी चर्चा केली आहे.

सर्वपक्षीय बैठकीचे आयुक्तांना पत्र

शहरातील ज्या भागात रस्त्याची कामे झालेली नाहीत, त्या भागातील रस्त्याचे क्रॉंकिटीकरण करण्यासाठी शासनातर्फे शंभर कोटी रुपये मंजूर केले आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

शहरातील अनेक रस्त्यांची कामे होत आहेत, त्यातील काही रस्त्यांची कामे अगोदरच्या निधीतून मंजूर आहेत. या निधीतूनही काही रस्ते करण्यात येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत.

त्या अडचणी सोडवून रस्त्यांची कामे सुलभ व्हावीत, यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक घ्यावी. या बैठकीत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या सूचना घेऊन ज्या भागातील रस्त्यांची कामे झाली आहेत, त्या भागातील रस्त्याची कामे वगळून नवीन भागातील रस्त्याची कामे घेण्यात येतील.

कॉंक्रिटीकरणाचे काम लवकरच

शहरातील शंभर कोटी रुपयांच्या मंजूर निधीतून कॉंक्रिटीकरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. याबाबत त्यांनी म्हटले आहे, की रस्त्यांच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सर्वेक्षण सुरू आहे. कामाच्या एकत्रित निविदा मागविण्यात येणार आहेत, तसेच एकाच कंपनीला रस्त्याचे काम देण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT