eknath khadse esakal
जळगाव

Jalgaon Eknath Khadse : पाणीटंचाईवरून खडसेंकडून अधिकारी धारेवर; आढावा बैठकीत शिंदे सरकारवर टीका

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Eknath Khadse : शहरासह तालुक्यात प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पाणीटंचाईची समस्या उद्भवली असून, शहरात २१ दिवसांआड पाणी येत आहे तर शासन आपल्या दारी म्हणणाऱ्या शिंदे सरकारच्या काळात जनता पाण्यासाठी भिकारी झाल्याचा अनुभव येत आहे, अशा शब्दांत आमदार एकनाथ खडसे यांनी टीका केली, तसेच पाणीप्रश्‍नावरून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. (MLA Eknath Khadse criticized shinde fadnavis govt and water shortage issue jalgaon news)

येथील तहसीलदार कार्यालयात शुक्रवारी (ता. २३) अकराला पाणीटंचाईवर आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत शिंदे, फडणवीस सरकारच्या कामकाजावर जोरदार प्रहार केला, तसेच पाणीप्रश्‍नी २७ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार असल्याचा इशारा दिला.

तसेच मतदारसंघात नवीन आमदार असल्याने प्रशासकीय अधिकारी तालुक्यात हजर होत नाहीत, अशी कोपरखळी देखील आमदार चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता काढली.

या वेळी तहसीलदार अनिल वाणी, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, ओडीए प्रादेशिक अभियंता विशाल तायडे, नगरपंचायत मुख्याधिकारी गजानन तायडे बैठकीला हजर होते. या वेळी आमदार एकनाथ खडसे, माजी गटनेते कैलास चौधरी यांनी पाणीपुरवठ्याबाबत मुख्याधिकारी तायडे यांना धारेवर धरले. खडसे म्हणाले, की मागील आमच्या काळात शहरात पाणीपुरवठा पाच ते सात दिवसांआड होता.

तालुक्यातही पाणीपुरवठा व्यवस्थित होता. आता शहराला २१ दिवसांआड पाणीपुरवठा कसा काय होत आहे? आपले नियोजन नाही का ? गरज भासल्यास शासन स्तरावर प्रस्ताव तयार करून टँकर व्यवस्था का करण्यात आली नाही, असे प्रश्न आमदार खडसे यांनी अधिकाऱ्यांना विचारले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या वेळी तालुक्यातील ४४ गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेंतर्गत जी कामे आहेत झाली आहेत, त्या पैशांचा चुराडा असून, तालुक्यात आमच्या तिसरा वर्षाच्या काळात भरपूर विहिरी, बोअरवेल केले, पण पाणी लागले नाही. जलजीवन योजनेतून काय पाणी लागणार? असा प्रतिप्रश्न त्यांनी अधिकाऱ्यांना केला. जामठी येथे जलजीवनच्या ७० फूट विहिर कोरडीठाक असून, तालुक्यातील साळशिंगी, मुक्तळ येथे काय परिस्थिती आहे.

या तालुक्यात पाणी नसताना योजनेच्या जलवाहिनी टाकल्या जात आहेत, याचे काय निकष असतील, ते दाखवले गेले पाहिजे. त्याच प्रमाणे कामे झाली पाहिजे. या वेळी गटविकास अधिकारी इंगळे यांनी पाच गावांमध्ये विहिरी अधिग्रहण व टँकर व्यवस्था करण्यात आली आहे.

त्यामध्ये विहीर अधिग्रहण वरखेडा खुर्द,'वरखेड बुद्रुक, मनूर बुद्रुक आणि मनूर खुर्द येथे विहीर अधिग्रहण व एणगाव येथे टँकर व्यवस्था करण्यात आली आहे, असे सांगितले.

या वेळी रामदास पाटील, गटनेता जफर शेख, नगरसेवक भरत पाटील, हकीम बागवान, लतिफ शेख, रूपेश गांधी, गोपाल गंगतिरे, प्रदीप बडगुजर, राष्ट्रवादी महीला तालुकाध्यक्ष वंदना पाटील शहराध्यक्ष प्रतिभा खोसे, कविता गायकवाड यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करा

आढावा बैठकीत आमदार एकनाथ खडसे यांनी अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभाराचा लेखाजोखा मांडला. तालुक्यात असलेल्या पाणीटंचाईला शिंदे, फडणवीस सरकार व शासनाचे काही अधिकारी जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली. या वेळी खडसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करत तालुक्यातील काही कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करा, त्याना निलंबित करा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना खडसे यांनी केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arif Khan Chishti : मुस्लिम तरुणाचा मोठा निर्णय! संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी, वाचा कोण आहे आरिफ खान?

Whatsapp Mirror : व्हॉट्सअ‍ॅपवर एक परमिशन अन् बँक अकाऊंट रिकामं, 'हे' फेमस फीचर ठरतंय मोबाईल हॅकिंगचं कारण

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT