MLA Mangesh Chavan at ceremony of Punyashlok Ahilya Devi Holkar Memorial Restoration work at Town Hall esakal
जळगाव

Jalgaon News : सामाजिक सभागृहासाठी 1 कोटी देणार : आमदार मंगेश चव्हाण

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : गेल्या वर्षी चौकाचे सुशोभिकरण करण्याचा शब्द समाजबांधवांना दिला होता. तो आपण पाळला असून, वर्षभरातच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीला आमदार निधीतून १५ लाख रुपये खर्च करून स्मारकाचा जीर्णोद्धार होत आहे. (MLA Mangesh Chavan announced to give 1 crore for social hall jalgaon news)

या पुढील काळात देखील धनगर समाजाच्या शाश्वत विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली. याप्रसंगी तालुक्यात विविध ठिकाणी धनगर समाजासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या नावाने भव्य सभागृह उभारण्यासाठी एक कोटी निधी देण्याची घोषणा देखील आमदार चव्हाण यांनी केली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक जीर्णोद्धार व चौक सुशोभीकरण कामाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी गेल्या रविवारी(ता. २८) होळकर चौक टाउन हॉल येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

याप्रसंगी धनगर समाज सेवा संस्थेचे प्रदेशाध्यक्ष व भाजप भटके-विमुक्त आघाडीचे उत्तर महाराष्ट्राचे संयोजक नवनाथ ढगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच येथील धनगर समाज उन्नती मंडळचे साहेबराव आगोणे, शिवाजी हडपे, राजेंद्र रावते, धर्मा काळे आदी मान्यवर व तालुक्यातील व शहरातील धनगर समाजातील व भाजपची नेतेमंडळी व्यासपीठावर उपस्थित होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आमदार चव्हाण पुढे म्हणाले, की पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे कार्य मोठे आहे, त्या केवळ धनगर समाजाच्याच नाही तर सर्व भारतीयांच्या राजमाता आहेत. ज्या राजमातेने भारतातील काशी विश्वनाथ, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आदी शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार केला, नदीवर घाट बांधले, आपल्या धार्मिक अस्मितांचे रक्षण केले, त्यांच्या स्मारकाचा जीर्णोद्धार करता आला हे मी माझे भाग्य समजतो. सुरवातीला धनगर समाजातर्फे आमदार चव्हाण यांना धनगरी फेटा बांधून, तसेच काठी व धनगरी घोंगडे देऊन सत्कार करण्यात आला.

समाजाचे प्रदेशाध्यक्ष नवनाथ ढगे यांनी सांगितले, की धनगर समाजाला आमदार चव्हाण यांनी दिलेला शब्द पाळला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. स्मारकाचे नेत्रदीपक असे सुशोभिकरण झाल्यामुळे परिसराची देखील शोभा वाढली आहे.

धनगर समाजाने देखील आमदारांच्या कामाची दखल घेत त्यांना साथ द्यावी. ॲड. कैलास आगोणे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची भूमिका मांडली व समाजाच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. अमोल नानकर यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वितेसाठी धनगर समाज पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रेखा धनगर चाळीसगावचा गौरव

सत्कारप्रसंगी आमदार चव्हाण यांनी, तुम्ही दिलेली काठी ही समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात वापरेल आणि खांद्यावर दिलेली घोंगडी ही समाजाच्या जबाबदारीची जाणीव करून देत राहील.

वाघळी येथील रेखा धनगर हिच्यासारखी आंतरराष्ट्रीय खेळाडू केवळ धनगर समाजाचाच नव्हे तर चाळीसगावचा गौरव आहे. तिचे पालकत्व घेत विदेशात पाठवता आले ते केवळ तालुकावासीयांनी मला आमदारकीची जबाबदारी दिली म्हणून मला ही संधी मिळाली, असे सांगितले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today: दसऱ्यानंतर सोन्याच्या भावात घसरण; चांदीत वाढ कायम, काय आहे आजचा भाव?

गायक झुबीन गर्ग यांच्या मृत्यूचं गुढं उलगडलं, स्कुबा डायव्हिंग नाही तर हे होतं मोठं मृत्यूचं कारण, पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा ‘Azad Kashmir’चा नारा; माफी मागायची सोडून आपलीच टिमकी मिरवतेय...

'तुम्हाला I Love Modi म्हटलं तर चालतं, मग I Love Mohammad म्हटलं तर वाद का?' ओवेसींचा थेट सवाल, मोदींसह RSS वर जोरदार निशाणा

Kantara Chapter 1 Box Office : 'कांतारा चॅप्टर 1' वादळ! पहिल्या दिवशी केली तब्बल 'इतक्या' कोटींची कमाई, छावा-सैयारासह 10 चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT