MLA Mangesh Chavan speaking in the General Assembly on Monday esakal
जळगाव

MLA Mangesh Chavan : जिल्हा दूध संघाचा तोटा खडसेंच्याच काळातील : आमदार मंगेश चव्हाण

सकाळ वृत्तसेवा

MLA Mangesh Chavan : जिल्हा दूध संघाला सहा कोटींचा तोटा मंदाकिनी खडसे अध्यक्ष असतानाच्या काळातीलच आहे. आम्हाला केवळ तीन महिने कालावधी मिळाला असून, त्या काळात नफा झाला आहे, असे मत जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी जिल्हा दूध संघात सहा कोटी रुपयांचा तोटा असल्याचा आरोप केला आहे. त्यावर खुलासा करताना आमदार मंगेश चव्हाण म्हणाले, की आम्ही डिसेंबर २०२२ मध्ये सत्तेवर आलो. आम्हाला जानेवारी, फेब्रुवारी व मार्च असा केवळ तीन महिन्यांचा कालावधी मिळाला.

या तीन महिन्यांत आम्ही दूध संघ नफ्यात आणला. अगोदरचा आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी जुन्या संचालक मंडळाचा आहे. त्यांच्या काळात संघ एकही दिवस नफ्यात नव्हता. त्याच काळात तब्बल सहा कोटी रुपयांचा तोटा झाला.

त्यामुळे एकनाथ खडसे यांचा आरोप अत्यंत चुकीचा आहे. ‘खोटं बोल; पण रेटून बोल’ असे ते नेहमी करतात. त्याचप्रमाणे त्यांनी जिल्हा दूध संघाचा तोटा आमच्या काळातील असल्याचे म्हटले.

जिल्हा दूध संघाची आज सभा

जळगाव जिल्हा दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (ता. २४) आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा दूध संघाचे विद्यमान अध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT