MLA Rohit Pawar sitting in public during Sharad Pawar's meeting on Tuesday. esakal
जळगाव

Jalgaon Rohit Pawar : शरद पवारांच्या सभेत ऊन्हामुळे गोंधळ; रोहित पवार जनतेत गेले अन्‌ गोंधळ शांत झाला...

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Rohit Pawar : शहरात मंगळवारी (ता. ५) उन्हाचे प्रमाण व तापमानही जास्त होते. शरद पवार यांची सभा सुरू असतानाही मंडपाच्या डी झोनमध्ये ऊन आले होते. त्यावेळी नागरिक सावलीसाठी पुढे सरकत असल्याने एकच गोंधळ उडाला.

परंतु, हा गोंधळ शांत करण्यासाठी शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार व्यासपीठावरून उतरून थेट उन्हात जनतेत जावून बसले अन्‌ गोंधळ शांत झाला. (MLA Rohit Pawar seats with public in sharad pawar meeting jalgaon news)

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांची मंगळवारी जळगावात जाहीर सभा झाली. जळगाव जिल्ह्यात पावसाने दडी मारली असून, रोज उन व तापमानही वाढत आहे. जनता मात्र पावसाची प्रतिक्षा करीत आहे. पाऊस येईल या अपेक्षेने सभेच्या ठिकाणी व्यासपीठ, तसेच जनतेसाठी वॉटरप्रूफ तंबू उभारण्यात आला होता.

मात्र, व्यासपीठ आणि तंबूत मधली डी झोनची जागा मोकळीच होती. त्या ठिकाणी वरच्या भागात कोणतेही आच्छादन नव्हते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दुपारी दोनला सभा सुरू झाल्यानंतर ऊन वाढत गेले. साडेतीनच्या सुमारास अधिकच उन वाढले. गर्दीही वाढली होती. त्यावेळी काही नागरिक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी डी झोनमध्ये सावली शोधत त्या ठिकाणी जागा मिळविण्याचा प्रयत्न करू लागले.

पोलीसांनी विरोध केला, परंतु प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पोलीसांना जागा देण्यास सांगितले. त्यावेळी एकच गोंधळ उडाला. हा प्रकार पाहून आमदार रोहित पवार व्यासपीठावरून खाली आले. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी डोक्यावर मुंडासे बांधून ते जनतेत बसले. त्यानंतर नागरिकही शांत झाले अन्‌ सभा शांततेत झाली. सभा संपेपर्यंत आमदार पवार जनतेतच बसून होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT