SYSTEM
जळगाव

ट्रॅफिक कंट्रोल न करता पोलिसांची वसुली : आमदार संजय सावकारे

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ट्रॅफिक पोलिसांचे काम ट्रॅफिक कंट्रोल करून वाहतुकीची कोंडी सोडविणे. मात्र ट्रॅफिक पोलिस ट्रॅफिक कंट्रोल करणे सोडून वाहनांना थांबवून त्यांच्याकडून विविध प्रकारचे कागदपत्रांची मागणी करतात, ती न दिल्यास वसुली करतात. या पोलिसांना वसुलीचे टारगेट दिलेले असल्याचा आरोप आमदार संजय सावकारे यांनी शुक्रवारी (ता. १७) नियोजन समितीच्या सभेत करीत, सर्वांचे लक्ष वेधले.

दरम्यान, या आरोपांना आमदार चिमणराव पाटील यांनीही गंभीरतेने घेत हा आरोप गंभीर असल्याचे सांगत पालकमंत्र्यांनी यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची सभा होती. त्यात आमदार सावकारे यांनी ट्रॅफिक पोलिसांच्या कार्यपद्धती सर्वांसमोर उघड केली. अनेक ठिकाणी चौकाचौकात वाहनांची अतिक्रमणे आहे, त्याकडे लक्ष दिले जात नाही. मात्र जी वाहने ये-जा करतात त्यांना अडवून त्यांच्याकडून कागदपत्रांची मागणी केली जाते, ती न दिल्यास वसुली केली जाते. डिपार्टमेंटने त्यांना वसुलीसाठी नेमले आहे की ट्रॅफिक कंट्रोलसाठी ? यावर पोलिस अधिकाऱ्यांनी कारवाई करावी.

राष्ट्रीय महामार्गाची निर्मिती भरधाव वेगाने वाहने जावीत यासाठी आहे. मात्र महामार्गावर कोणत्याही ठिकाणी वाहनांचा स्पीड किती असावा याबाबतचे फलक नाही. मुक्ताईनगर ते जळगाव दरम्यान स्पीड लिमीटचा फलक नाही. मग आरटीओ विभागाचे अधिकारी त्यांची वाहने एका बाजूला लावून इतर वाहनांवर वेग मर्यादा ओलांडल्यास त्यांना लागलीच ऑनलाइन दंडाचा मेमो पाठवितात. हा प्रकारही चुकीचा आहे. स्पीड लिमीटचा फलक लावावा जेणे करून वाहनधारकांना त्याचा वेग नियंत्रणात ठेवून वाहने चालविता येतील. अन्यथा ते वेगानेच वाहने चालवतील.

टोल नाका बंद करा

चिखली ते तरसोद महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल, रस्त्याची कामे बाकी आहेत. असे असल्यावर टोल वसुली सुरू झाली. ती चुकीची आहे. फेकरीचा टोल नाका सुरू असताना नशिराबादजवळ टोलनाका सुरू करून वाहनधारकांची केवळ लुट महामार्ग प्राधिकरण करीत आहे. वीस किलोमीटरच्या परिसरात दुसरा टोल आकारू शकत नाही, असा नियम आहे. असे असताना टोल वसुली होते आहे. आता टोल नाक्यावर केवळ १ ते १० तारखे दरम्यानच मासिक पास दिल्या जात आहे. इतर वेळी मासिक पास मिळत नाही. वाहनधारकांना पूर्ण टोल भरावा लागत आहे. रोज असंख्य वाहने भुसावळ, मुक्ताईनगवरून जळगावला असंख्य मोठी वाहने येतात. त्यांना हा भुर्दंड बसतो. हा टोल नाका बंद करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'राजा शिवाजी' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, पाचव्या दिवशी कमावले 'इतके' कोटी

Satej Patil Amal Mahadik Meet : अमल महाडिक मला वारंवार भेटतात पण, मुश्रीफ भेटत नाहीत; सतेज पाटलांनी गोकुळ, केडीसीसीतील इनसाईड स्टोरीच सांगितली

West Bengal election: भाजपने संधी दिली अन् भांडी घासणारी महिला झाली आमदार; कलिता मांझींचा थक्क करणारा प्रवास!

WhatsApp गुपचुप हटवत आहे सगळ्यांचे आवडते फीचर! तुम्हाला कळणारही नाही अन् बदलून जाईल तुमचे ॲप

ऋतुराजचा विक्रम धोक्यात? Sanju Samson ने एकाच हंगामात दोनदा केला 'हा' पराक्रम; दिल्लीच्या गोलंदाजांचा उडवला थरकाप

SCROLL FOR NEXT