thief Arrested esakal
जळगाव

Jalgaon : मोबाईल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

रईस शेख्

जळगाव : शहरात मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या भामट्याला (Mobile Thief) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील एक मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. युसूफ शेख ऊर्फ चिल्या इसा शेख (रा. शिवाजीनगर हुडको, जळगाव) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. (Mobile thief caught red handed Jalgaon Crime News)

जळगाव शहरात विविध ठिकाणी मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला चोरट्याचा शोध घेऊन त्यास अटक करण्याच्या सूचना व आदेश दिले होते. शिवाजीनगर हुडकोतील संशयित युसूफ शेख ऊर्फ चिल्या हा मोबाईल चोरीत पारंगत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्याच्या पथकातील विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, नितीन बाविस्कर, राहुल पाटील अशांच्या पथकाने शिवाजीनगर भागातून माहिती काढून संशयित युसूफ शेख यास अटक केली. दोन अल्पवयीन साथीदारांसोबत मोबाईल चोरीच्या गुन्ह्याची संशयित युसूफ शेख याने कबुली दिली आहे. त्याच्याकडून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : चार सामने अन् Orange Cap साठी ७ दावेदार! विराटचा शेवटचा क्रमांक, Vaibhav Sooryavanshi पण आहे पुढे, टॉपर कोण?

डोळ्यात संताप अन् लेकरासाठीची तगमग; प्रार्थना बेहेरेच्या 'मर्दिनी'चा टीझर प्रदर्शित; दिसणार अभिनेत्रीचा दमदार अंदाज

कला, नृत्य आणि विज्ञानाचा संगम... मुंबईत ओपन सायन्स पार्क साकारतंय! विज्ञान शिकणं होणार आणखी रंजक

Mhada Lottery: काही दिवस बाकी! म्हाडाच्या २,६४० घरांची लॉटरी, लगेचच करा अर्ज; कुठे आणि कसा? जाणून घ्या...

Nautapa 2026: नवतापा म्हणजे काय? वर्षातील सर्वात गरम दिवसांमागचं धार्मिक आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT