Demolished house esakal
जळगाव

Jalgaon : पावसाने तालुक्यातील 6 गावांत घरांचे नुकसान

मिलिंद वानखेडे

अमळनेर (जि. जळगाव) : तालुक्यात शुक्रवारी (ता. १०) झालेल्या वादळी पावसाने (Stormy Rain) सहा गावांत घरांचे नुकसान झाले असून, काही ठिकाणी झाडे पडून रस्ते बंद झाले होते. तालुक्यात सर्वत्र वादळी पाऊस, गारपीट (Hail) झाली. प्रभारी तहसीलदार नवनाथ लांडगे यांनी सुटी असताना सुद्धा तलाठ्यांना प्राथमिक नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी पाठवले. (monsoon Rains damage houses in 6 villages in Amalner jalgaon news)

जळोद, सावखेडा, मांडळ, रंजाने, नंदगाव, धार आदी गावात घरांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पूर्ण घर, पत्रे तर काही ठिकाणी भिंती पडल्याने कुटुंब उघड्यावर आली आहेत. मांडळ येथे माध्यमिक शाळेच्या दोन खोल्यांचे पत्रे उडल्याची माहिती मुख्याध्यापक बापू चव्हाण यांनी दिली. मांडळ परिसरात देखील अनेक ठिकाणी झाडे पडली होती. अमळनेर - जळोद रस्त्यावर झाडे पडून रस्ता बंद झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने रस्त्यावरील झाडे हटविण्यात आली. सोमवारी सविस्तर पंचनामे करण्यात येऊन नेमके किती नुकसान झाले याचा अहवाल प्राप्त होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT