Suicide esakal
जळगाव

5 वर्षीय मुलाला मारून आईचीही आत्महत्या

सकाळी लवकर उठणारा ऋषांत आज का उठला नाही म्हणून त्याची आजी त्याला पाहण्यासाठी वरच्या खोलीत गेल्या असता, तो पलंगावर मृतावस्थेत आढळून आला.

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर (जि. जळगाव) : आपल्या पाच वर्षीय मुलाचा गळा आवळून स्वतःही घराच्या वरच्या मजल्यावर दोरीने गळफास घेऊन ३२ वर्षीय विवाहितेने शिरूड (ता. अमळनेर) येथे आपल्या माहेरी आत्महत्या केल्याची घटना आज (ता. १७) सकाळी सातच्या पूर्वी घडली.

शिरूड (ता. अमळनेर) येथील वसंत बळिराम पाटील यांची मुलगी पूर्वी यांचे शिक्षण एम. एस्सी. झाले असून त्यांचा २०१५ मध्ये नंदुरबार येथील दीपक पाटील (सोनवणे) यांच्याशी विवाह झाला होता. त्यांना ऋषांत नावाचा पाच वर्षांचा मुलगा आहे. सौ. पूर्वी या मुलगा ऋषांत सोबत दोन वर्षांपासून आपल्या माहेरी वडिलांकडे शिरुडला राहत होत्या. ऋषांत हा दररोज आपल्या आजी आजोबांसोबत झोपायचा. गुरुवारी (ता. १६) मात्र पूर्वी यांचे जेवण झाल्यानंतर त्या ऋषांतला वरच्या खोलीत आपल्या सोबत झोपायला घेऊन गेल्या. दररोज सकाळी ऋषांत लवकरच उठत असल्याने आज का उठला नाही म्हणून त्याची आजी त्याला पाहण्यासाठी वरच्या खोलीत गेल्या असता, तो पलंगावर मृतावस्थेत आढळून आला. पूर्वी यांनी छताच्या लोखंडी कडीला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतलेला होता. मयत ऋषांतचा गळा दोरीने आवळल्याचे स्पष्टपणे दिसत होते. खोलीत सौ. पूर्वी यांनी लिहिलेली चिठ्ठी देखील मिळून आली. त्यात त्यांनी माझ्या मृत्यूला कोणालाही दोषी धरु नये, असे लिहिले असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेबाबत पोलिस पाटील विश्‍वास महाजन यांनी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. याबाबत अमळनेर पोलिसात पूर्वी पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक गंभीर शिंदे व कर्मचारी कैलास शिंदे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'राजा शिवाजी' सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, पाचव्या दिवशी कमावले 'इतके' कोटी

Satej Patil Amal Mahadik Meet : अमल महाडिक मला वारंवार भेटतात पण, मुश्रीफ भेटत नाहीत; सतेज पाटलांनी गोकुळ, केडीसीसीतील इनसाईड स्टोरीच सांगितली

West Bengal election: भाजपने संधी दिली अन् भांडी घासणारी महिला झाली आमदार; कलिता मांझींचा थक्क करणारा प्रवास!

WhatsApp गुपचुप हटवत आहे सगळ्यांचे आवडते फीचर! तुम्हाला कळणारही नाही अन् बदलून जाईल तुमचे ॲप

ऋतुराजचा विक्रम धोक्यात? Sanju Samson ने एकाच हंगामात दोनदा केला 'हा' पराक्रम; दिल्लीच्या गोलंदाजांचा उडवला थरकाप

SCROLL FOR NEXT