late Ila with her sons Mahesh & Ritesh Pavra esakal
जळगाव

Jalgaon : 2 चिमुकल्यांसह आईचा पाण्यात बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

बातमीदार - जीवन चव्हाण

चाळीसगाव (जि. जळगाव) : तालुक्यातील रांजणगाव शिवारातल्या एका विहिरीच्या पाण्यात दोन चिमुकल्यांसह आईचा बुडून (Drowned) दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची थरारक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात नोंद करण्यात आली आहे. (Mother drowned with her 2 sons Jalgaon Death news)

याबाबत सविस्तर वृत्त, धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील मनोज पावरा हे वरील ठिकाणी कुटुंबासह वास्तव्यास आहे. त्यांनी सन: २०१५-१६ मध्ये मध्यप्रदेश राज्यातील खेडी गावातील ईला नावाच्या मुलीशी विवाह केला. त्यानंतर त्यांना दोन मुले झाली. रितेश पावरा (वय-५) व महेश पावरा (वय-११ महिने) असे मुलांची नावे आहे. दरम्यान घरात हलाखीची परिस्थिती असल्याने सदर पावरा दाम्पत्य ठिकठिकाणी कामे करून आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाह करीत असतात. ते गेल्या महिन्यातच तालुक्यातील रांजणगाव येथे कामाला आले होते. मात्र बुधवार, २९ रोजी रात्री १०:३० वाजताच्या पूर्वी (वेळ निश्चित नाही) अचानक रितेश पावरा, महेश पावरा या चिमुकल्यांसह पत्नी ईला मनोज पावरा (वय- २५) यांचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला.

या घटनेने परिसरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तत्पूर्वी घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तेव्हा वरील तिघांपैकी एकाचाच मृतदेह पाण्यावर तरंगत होता. त्या मृतदेहाला विहिरीतून बाहेर काढताच पती मनोज पावरा यांनी पत्नी व एक मुलगाचा तपास नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावेळी पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने अजून विहिरीच्या तळाला तपास केला. तेव्हा वरील दोघांचेही मृतदेह मिळून आले. दरम्यान मयताचे कारण अद्याप स्प्ष्ट झालेला नसून वाद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोउनि लोकेश पवार हे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT