crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : मोटारसायकल चोरट्यास 3 दिवसात अटक

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस भवन बाहेरून मोटारसायकल चोरट्याला पोलिसांनी तांबापुरातून अटक केली आहे. राहुल गणेश महाजन असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

तीन दिवसांतच रामानंदनगर पोलिसांनी चोरट्याला अटक करून मोटारसायकल परत मिळविल्याने दुचाकी मालकाने पोलिसांचे आभार व्यक्त केले.(Motorcycle thief arrested by police in 3 days jalgaon crime news)

भाऊसाहेब दादाजी बागूल (रा.आकाशवाणी चौक) परिवारासह वास्तव्याला आहे. गुरुवारी (ता.२३) रात्री ८ वाजता ते आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाजवळ आले होते.

त्यांनी त्याची दुचाकी (एमएच ४१ आर २३६३) बाहेर उभी केली असताना अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र, चोरून नेलेली दुचाकी ही लाडवंजारी मंगल कार्यालयावरून संशयित राहुल महाजन हा घेऊन गेल्याची गुप्त माहिती रामानंदनगर पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिस नाईक संजय सपकाळे, जितेंद्र राजपूत, विजय खैरे, पोलिस नाईक हेमंत कळसस्कर, विनोद सूर्यवंशी, उमेश पवार, जुलालसिंग परदेशी, इरफान मलिक यांच्या पथकाने संशयित राहुल गणेश महाजन (वय-२० रा.तांबापुरा) याला अटक केली. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT