Ashok Ladvanjari, Rinku Chaudhary etc. celebrating Prime Minister Narendra Modi's birthday as 'April Fool' day.  esakal
जळगाव

Jalgaon News : मोदींच्या विकासाचा जन्मदिन म्हणजे ‘एप्रिल फूल’....

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस महानगर व राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ वर्षांत दिलेल्या विकासकामांची सर्व आश्वासने निष्फळ ठरत असल्याने मोदींच्या विकासकामांचा वाढदिवस म्हणजेच ‘एप्रिल फूल’ दिन म्हणून साजरा झाला. (Movement of Nationalist Congress Party against development work which not done by narendra modi jalgaon news)

राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक काँग्रेसचे महानगराध्यक्ष रिंकू चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ निवडणुकीपूर्वी महागाई कमी करणार, युवकांना रोजगार देणार आदी आश्वासने दिली होती. मात्र, ते पंतप्रधान झाल्यापासून महागाई आकाशाला भिडली आहे.

युवकांना रोजगार मिळणार होते ते प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला स्थलांतरित केले. त्यामुळे महाराष्ट्रातील रोजगार कमी करीत आहेत, म्हणून त्यांची आश्वासने निष्फळ ठरत आहे, त्यामुळे मोदींचा विकासकामांचा आश्वासनांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. ‘मोदी तेरे राजमे अगाया कटोरा हाथमे’, ‘काय दिले आठ वर्षांत एप्रिल फूल, एप्रिल फूल’, ‘युवकांना रोजगार मिळालाच पाहिजे’, महागाई कमी करावी, अशा विविध घोषणा देण्यात आल्या.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

राजू मोरे, इब्राहिम तडवी, भगवान सोनवणे, किरण राजपूत, सहील पटेल, चंदन कोळी, चेतन पवार, कुंदन सूर्यवंशी, ललित नारखेडे, सचिन साळुंखे, योगेश साळी, रितेश महाजन, हितेश जावळे, भूमेश निंबाळकर, रहीम तडवी, आकाश हिरवाडे, योगेश कदम, भाला तडवी, राहुल टोके आदी या वेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT