raksha khadse 
जळगाव

स्पेलिंगमधील चुकीने लेवा समाजातील विद्यार्थी राहतात वंचित 

दिपक चौधरी

मुक्ताईनगरः केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाच्या जातीच्या सूचीत ‘लेवा पाटीदार’ या नावातील स्पेलिंगमध्ये फरक असल्याने या ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना योजनांचा लाभ मिळू शकत नाही, त्यामुळे या स्पेलिंगची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी खासदार श्रीमती रक्षा खडसे यांनी आज लोकसभेत केली. 

लेवा पाटीदार या इंग्रजी शब्दाच्या स्पेलिंगमधील चूक श्रीमती खडसेंनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. महाराष्ट्र राज्याच्या जातींच्या सूचीत लेवा पाटीदारचा उल्लेख Leva patidar नमूद असून केंद्र सरकारच्या सूचीत Lewa patidar असे स्पेलिंग आहे. त्यामुळे लेवा पाटीदार समाजातील विद्यार्थ्यांच्या जातपडताळणी दाखल्यांमध्ये Leva patidar असे स्पेलिंग असल्याने तो केंद्र सरकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशांसाठी अर्ज करतो त्यावेळेस स्पेलिंग तफावतीमुळे विद्यार्थ्याला खुल्या प्रवर्गात समाविष्ट केले जाते. परिणामी, त्यास ओबीसींसाठीच्या योजनांचा लाभ मिळू शकत नाही. 

दोन वर्षापासून दुर्लक्ष

रावेर लोकसभा क्षेत्रामध्ये लेवा समाजाच्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या दोन वर्षापासून या स्पेलिंगमध्ये बदल करण्यासाठी अनेक सामाजिक संस्थांमार्फत सामाजिक न्याय मंत्रालय व एनसीबीसी कमिशनमध्ये निवेदने दिली आहेत. आजपर्यंत दुरुस्ती झालेली नाही. ती तातडीने करावी आणि केंद्राच्या सूचीत Leva ऐवजी Lewa असा उल्लेख करावा, अशी मागणी त्यांनी केली. 

संपादन- भूषण श्रीखंडे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smriti Mandhana Father: स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती आता कशी आहे? डॉक्टरांनी दिली महत्त्वाचे अपडेट्स

Pune Traffic Update : आज मध्यरात्रीपासून सिंहगड घाट वाहतुकीसाठी बंद; प्रशासनाचा आदेश; हे आहेत पर्यायी मार्ग!

India Squad Announcement: द. आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी गिलच्या ऐवजी 'हा' खेळाडू भारताचा कर्णधार; ऋतुराज, जडेजाचे पुनरागमन

"काय फालतू गाणं आहे !" दिग्दर्शकाने 31 वर्षांपूर्वी रिजेक्ट केलेलं गाणं पण नंतर तेच झालं सुपरहिट

Latest Marathi News Live Update : घटना घडली तेव्हा घरात नव्हतो, खिडकीतून आत प्रवेश केला, गौरीचा पती अनंत गर्जेचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT