Women officers celebrating Sanjay Raut's bail by beating drums and playing balloons in front of the Municipal Corporation on Wednesday. In the second picture, the official is giving alms to Vishnu Bhangale esakal
जळगाव

Jalgaon : खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर; शिवसेना ठाकरे गटातर्फे जल्लोष

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांचा न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने शहरातील पदाधिकाऱ्यांनी जळगाव महापालिकेसमोर बुधवारी (ता. ९) आतषबाजी करून व पेढेवाटप करून जल्लोष केला.

मुंबई येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांना अटक करून न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. शंभर दिवसांपासून खासदार राऊत कारागृहात होते. (MP Sanjay Raut granted bail Cheers by Shiv Sena Thackeray group Jalgaon Political News)

न्यायालयाकडून जामीन मिळावा, यासाठी त्यांनी पीएमएलएल न्यायालयात अनेकदा अर्ज केले. मात्र, त्यांचा जामीन नाकारण्यात आला. बुधवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातर्फे आतषबाजी करून व पेढेवाटप करून जल्लोष करण्यात आला.

विशेष म्हणजे महिला कार्यकर्त्यांनी फुगडी खेळून आनंदोत्सव साजरा केला. जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, गजानन मालपुरे, महिला आघाडीच्या मंगला बारी यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT