Unmesh Patil sakal
जळगाव

पावसाने तारले.. आता कृषी विभागाने मारू नये; खासदारांची मागणी

उन्मेष पाटील यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांची भेट घेत सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणींबाबत चर्चा केली.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : रासायनिक खतांच्या पुरवठ्यात अनियमितता असून त्याबाबत तातडीने दखल घ्यावी, यासह पिकांच्या नुकसानीबाबत कंपन्यांकडून दिशाभूल होतेय, त्याकडेही लक्ष द्यावे.. पावसाने यंदा तारले मात्र कृषी विभागाने शेतकऱ्यांना मारु नये, अशी मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी केली आहे. (Latest Marathi News)

उन्मेष पाटील यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांची भेट घेत सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणींबाबत चर्चा केली. या वेळी कृषी उपसंचालक अनिल भोकरे, प्रकल्प उप संचालक कुरबान तडवी, भाजपा तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे, पंचायत समितीचे सदस्य रवींद्र चौधरी, माजी सरपंच रवींद्र पाटील, भरारी फाऊंडेशन अध्यक्ष दीपक परदेशी, मोहीम अधिकारी विजय पवार, पोखरा प्रकल्प समन्वयक संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

या केल्या मागण्या

रासायनिक खत बाजारपेठेमध्ये जादा दराने/लिंकिंगने घ्यावा लागत आहेत व काही ठिकाणी खत उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आहेत. त्याची तत्काळ दखल घेत जळगाव जिल्ह्यात असलेल्या खतांचा बफर स्टॉक रिलीज करावे. गेल्या वर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जळगाव जिल्हा मोठ्या प्रमाणात कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, मका इ. पिकांसाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली होती. अंदाजे २०० कोटींचा निधी याअंतर्गत प्राप्त झाला होता. यावर्षी देखील योजनेत शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवित असून ज्या त्यात काही तांत्रिक अडचणी आहेत, त्या दूर कराव्यात. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ‘पोकरा’ योजनेच्या योग्य अंमलबजावणीचाही निवेदनात उल्लेख आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagannath Rathyatra : पुण्यात रविवारी भगवान जगन्नाथ रथयात्रा; मध्यभागात दुपारी एकपासून वाहतूक मार्गात बदल

Video: स्कूल व्हॅनला ट्रेनची जोराची धडक, ३ विद्यार्थ्यांसह ५ जणांचा मृत्यू; रेल्वे क्रॉसिंग ओलांडतांना दुर्दैवी अपघात

NEET-UG मध्ये 670 गुण; अतुल्या डोंगरेची AIR मध्ये 498 वी रँक

Matheran Mini Train : माथेरानची 'राणी' हायड्रोजन इंजिनवर धावणार!

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

SCROLL FOR NEXT