MSEB esakal
जळगाव

वीजचोरी करणाऱ्यांना 5 लाखांचा दंड; महावितरणची 18 ग्राहकांवर कारवाई

दंडाची रक्कम ग्राहकांनी मुदतीच्या आत भरली नाही तर त्यांच्यावर वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येणार.

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव (जि. जळगाव) : विजेच्या छेडछाड करून वीज चोरी करणाऱ्या खेडगाव (ता. चाळीसगाव) येथील एकूण १८ वीज ग्राहकांवर महावितरणने कारवाई करून संबंधिताना पाच लाखांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम ग्राहकांनी मुदतीच्या आत भरली नाही तर त्यांच्यावर वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांनी सांगितले.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये विजेची सर्रास चोरी होत असल्याची माहिती येथील महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांना मिळाली होती. त्यानुसार, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मीटर तपासणीची मोहीम गुरूवारपासून (ता. २) राबविण्यात आली. खेडगाव (ता. चाळीसगाव) येथे पथकाने जाऊन अचानक तपासणी केली असता, १८ वीज ग्राहकांनी त्यांच्या मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी केल्याचे आढळून आले. या सर्वांनी मिळून ३९ हजार १२ युनीट वीज चोरी केल्याने त्यांना ५ लाख ५ हजार ५५४ रुपयांचा दंड ठोठवला. यात मनीषा साळुंखे, भाऊराव साळुंखे, अरुण साळुंखे, नारायण साळुंखे, मनुबाई महाजन, लक्ष्मण वाणी, संभाजी साळुंखे, मेहमुदाबी मणीयार, शांताबाई माळी, केशवराम चंदरसिंग, युनूस मुसा खाटीक, अमीर वाझी मणियार, गंभीर अब्दुल पिंजारी, वामन पाटील, वसंत पाटील, पुंडलिक महाजन, नबाबाई चौधरी, राजेंद्र माळी यांचा समावेश आहे. दरम्यान, या सर्वांनी दिलेल्या मुदतीत दंडाची रक्कम भरली नाही तर त्यांच्याविरोधात वीज चोरीचा गुन्हा दाखल करू, असा इशारा श्री. शेंडगे यांनी दिला.

या कारवाया मुख्य कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता श्री. ब्राह्मणकर, सहाय्यक अभियंता श्री. नागदेव, श्री. कदम, श्री. खंदारे यांच्या पथकाने केली. दरम्यान, कोणीही आकोडे टाकून किंवा वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी करू नये अन्यथा नियमानुसार कारवाई केली जाईल, असे श्री. शेंडगे यांनी कळवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 MI vs SRH : ...अन् डोळ्यात पाणी आलं! वानखेडेवर Vinod Kambli ची ती अवस्था पाहून चाहते हळहळले; हृदयस्पर्शी Video Viral

अग्रलेख : संयुक्त अरब जागृती!

१२ जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष! विद्यापीठाने ५ दिवसांत लावले १७ अभ्यासक्रमांचे निकाल; उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीसाठी ७०० ते ८०० रुपये शुल्क, वाचा...

Panchang 30 April 2026 : आजचे पंचांग! नृसिंह जयंती, शुभ मुहूर्त आणि राहु काळ जाणून घ्या

Arjun Tendulkar: सचिन तेंडुलकरच्या लेकावर पुन्हा लागणार बोली; बेस प्राईज ५ लाख, BCCI ची परवानगी, LSG ने एकही मॅच नाही खेळवली

SCROLL FOR NEXT