MSEDCL Go Green
MSEDCL Go Green esakal
जळगाव

MSEDCL Go-Green scheme : वीज ग्राहकांकडून 20 लाख रुपयांची वार्षिक बचत! जळगाव जिल्‍ह्यातून साडेदहा हजार ग्राहक

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेंतर्गत वीज बिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद केला. या करिता केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’ चा पर्याय निवडणाऱ्या जळगाव परिमंडलातील १६ हजार ६६० ग्राहकांकडून १९ लाख ९९ हजार २०० रुपयांची वार्षिक बचत केली आहे. (MSEDCL Go Green scheme Annual savings of Rs 20 lakhs by electricity consumers jalgaon news)

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार वीज ग्राहकांनी छापील वीज बिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’ चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीज बिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे.

वीजबिल तयार झाल्यानंतर संगणकीय प्रणालीद्वारे ‘गो-ग्रीन’ मधील ग्राहकांना ‘ई-मेल’ द्वारे पाठविण्यात येत आहे. तसेच ‘एसएमएस’ द्वारे देखील वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना ‘प्रॉम्प्‍ट पेमेंट’ चा लाभ घेणे अधिक शक्य झाले आहे.

जळगाव जिल्‍ह्यातून अधिक ग्राहक

जळगाव परिमंडलांतर्गत जळगाव मंडलात १० हजार ६७७ ग्राहक 'गो-ग्रीन' योजनेत सहभागी झाले आहेत. धुळे मंडलात ‘गो-ग्रीन’ मध्ये ३ हजार ८५३ ग्राहक सहभागी आहेत. तसेच नंदुरबार मंडलातील २ हजार १३० ग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ मध्ये सहभाग घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : भुजबळ यांच्या नाराजीवर तटकरेंचे ‘ऑल इज वेल’; प्रदेशाध्यक्ष तटकरेंनी घेतली भुजबळांची भेट

Nupur Shikhare- Ira Khan : नुपूर शिखरेच्या आईचा बॉसी अंदाज; नवऱ्याची अवस्था पाहून आमिरची लेक म्हणाली...

SRH vs GT: सामना रद्द झाल्यानंतर काव्या मारन अन् विलियम्सनचं रियुनियन, सनरायझर्स हैदराबादन शेअर केला खास Video

VIDEO: पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत भर कार्यक्रमात गैरवर्तन; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "दहा हजारपेक्षा जास्त लोकांचा जमाव..."

Latest Marathi News Live Update : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे

SCROLL FOR NEXT