Bhusawal Railway station 
जळगाव

भुसावळ जंक्शनला ‘हायटेक’ रेल्वेस्थानकाचे स्वरूप

रेल्वेस्थानक मॉडेल स्टेशन करण्याच्या दृष्टिकोनातून रेल्वे विभागाचे प्रयत्न सुरू आहेत; पण रेल्वेस्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न रेल्वे विभाग आणि आरपीएफसमोर आहे.

चेतन चौधरी


भुसावळ : मध्य रेल्वेच्या (Central Railway) भुसावळ रेल्वे विभागातील (Bhusawal Railway Department) अत्यंत महत्त्वाच्या मॉडेल आणि 'अ' श्रेणीतील भुसावळ रेल्वे स्थानकाचा (Bhusawal Railway station) मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे. प्रवाशांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता, आरामदायी प्रवास होण्याच्या दृष्टीने रेल्वेच्या वतीने अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जातायत. वाय-फाय, सरकते जिने, लिफ्ट, स्वच्छता, वातानुकूलित विश्रामगृह, वॉटर व्हेंडींग मशिन, गुणवत्तापूर्ण खाद्य पदार्थ आदी सुविधांमुळे भुसावळ रेल्वे जंक्शन हे ‘हायटेक’ स्टेशन झाले असून, संपूर्ण स्थानकाचा 'लूक' बदलला आहे.


भुसावळ स्थानकावरून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. या प्रवाशांना सोयी-सुविधा देण्यासाठी रेल्वे प्रशासन निरंतर विकासकामे करीत आहे. स्थानकावरील पादचारी पुलाच्या उत्तर व दक्षिण या दोन्ही टोकांवर सरकते जिने सुरू करण्यात आले आहेत. तसेच लिफ्टची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. त्यामुळे वयोवृद्ध तसेच अपंग प्रवाशांसाठी बॅटरी कारची सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानकाच्या एन्ट्री पासून ते थेट रेल्वे गाडीपर्यंत प्रवाशांना या कारच्या साह्याने पोचविले जाते.

Bhusawal Railway station



वातानुकूलित प्रतीक्षालय
रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ४ वर भुसावळ मंडळातील पहिले खासगी वातानुकूलित वेटिंग हॉल (प्रतीक्षालय) सुरू करण्यात आला आहे. प्रतीक्षालयात चहा, नाश्ता याशिवाय बूट पॉलीश, बॉडी मसाज आदी सुविधा करण्यात येणार आहे. दरम्यान, एकाच वेळेस सुमारे ६० ते ७० प्रवासी बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी टीव्ही संच लावण्यात आलेले आहेत. आरामदायी सोफासेट व खुर्च्यांची सुविधा आहे.


फलाटांची संख्या वाढल्याने गाड्यांचा विलंब टळला

स्थानकावरील १ ते ८ फलाटांची लांबी जुन्या रेल्वे कोचेस अनुसार होती, परंतु नवीन एलएचबी कोचेसचा आकार व लांबी वाढल्यामुळे एक ते आठ फलाटांची लांबी ५० ते ८० मीटरने वाढविण्यात आली आहे. राजधानी सुपरफास्ट सारख्या गाड्यांना नवीन कोचेस डिझाईन करण्यात आलेले आहे. भुसावळ विभागातूनही अशाच पद्धतीने नवीन कोचेस असलेल्या प्रवासी गाड्या धावतात. यामुळे फलाटांची लांबी वाढविण्यात आली आहे. तसेच रेल्वे स्थानकावर आधी ८ फलाट होते. मात्र आता दोन फलाट नवीन वाढविण्यात आले आहेत. नवीन फलाटामुळे प्रवाशांची गर्दी कमी होऊन, तासन्तास आऊटरवर व यार्डामध्ये ताटकळत उभ्या असलेल्या प्रवासी गाडांना आता फलाटावर येण्यास विलंब होत नाही.

Bhusawal Railway station


सीसीटीव्हीमुळे सुरक्षा वाढली

रेल्वेस्थानक मॉडेल स्टेशन करण्याच्या दृष्टिकोनातून रेल्वे विभागाचे प्रयत्न सुरू आहेत; पण रेल्वेस्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न रेल्वे विभाग आणि आरपीएफसमोर आहे. स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मागील काही महिन्यात रेल्वेस्थानकावर चोऱ्यांच्या घटनेतही वाढ झालेली आहे. त्यामुळे येथे असलेले आरपीएफचे पोलिस कर्मचारी प्रत्येक गाडीवर लक्ष ठेवून असतात. याठिकाणी आता अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे
बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये चित्र अतिशय स्पष्ट दिसत असून, अतिशय बारकाईने प्रवाशांच्या संदिग्ध हालचाली टिपता येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal Scam : 'छगन भुजबळ यांनी कोट्यावधींचा घोटाळा केला'; शिंदे गटातील आमदाराचा गंभीर आरोप, अडिच लाख माथाडी कामगारांच्या रोजगारावर परिणाम

France vs Morocco: किलियन एम्बाप्पेची जादू कायम! फ्रान्स सलग तिसऱ्यांदा Fifa World Cup उपांत्य फेरीत; मोरोक्कोवर सहज विजय

Moshi Building : मोशी कचरा डेपो दुर्घटनेत तिसऱ्या दिवशीही बचावकार्य सुरूच; १६ जणांना बाहेर काढण्यात यश, ढिगाऱ्याखाली अजूनही कामगार अडकले

Nanded Highway: नांदेड हादरले! १,००० कोटींच्या महामार्गावरील उड्डाणपुलाची संरक्षक भिंत कोसळली; दोन प्राध्यापिका थोडक्यात बचावल्या

Ganpatipule Beach Closed : गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना बंदी! उदय सामंतांच्या सूचनेनंतर प्रशासनाकडून कडक पाऊल, अरबी समुद्रानं धारण केलंय रौद्ररूप

SCROLL FOR NEXT