jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News: मुंढोळदे ते सुलवाडी पूल मंजूर; शेतमाल वाहतूक होणार सुलभ

सकाळ वृत्तसेवा

मुक्ताईनगर : मुंढोळदे (खडकाचे) (ता. मुक्ताईनगर) ते सुलवाडी- ऐनपूर (ता. रावेर) या ठिकाणावरून दोन तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर तापी नदीवर मुंढोळदे (खडकाचे) गावाजवळ मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे १७५ कोटी रूपये निधीस अर्थसंकल्पात मंजुरी मिळालेली असून, यामुळे माझ्या शेतकरी राजा व जनतेला दूरचे अंतर सुलभ होईल व शेतीमालाची फरफट थांबणार आहे, अशी माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मुक्ताईनगर मतदार संघातील रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यात केळी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर असल्याने येथे होत असलेली केळी वाहतूक लांब पल्ल्याने करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना वाहतुकीचा मोठा भुर्दंड सोसावा लागतो. परंतु हतनूर धरणाच्या बॅक वॉटरमुळे तापी नदीपात्रात येथे मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेले असते.

तसेच या ठिकाणी पुलाचे काम मंजूर झाल्यास मुक्ताईनगर व रावेर तालुक्याला जोडणारा व कमी अंतरांचा महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे, अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी शासन दरबारी लावून धरलेली होती. यासाठी त्यांचा सतत पाठपुरावा सुरू होता, तर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आमदार पाटील यांना डिवचत पूल मंजूर केल्यास सत्कार करू, अशी वल्गना केली होती.

रोहिणी खडसे यांनी देखील भाषणाच्या ओघात सत्कार करण्याचे म्हटले होते. याच अनुषंगाने आता पूल मंजूर झालेला असून दोघे पिता पुत्री आमदार चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करणार का? असा सवाल सोशल मीडियावरून उपस्थित केला आहे.

चंद्रकांत पाटील यांचा पाठपुरावा

दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील हे शिंदे- फडणवीस सरकारमधील बाहुबली आमदार ठरलेले असून, सरकार स्थापन झाल्यापासून कोट्यवधींचा निधी मतदारसंघासाठी उपलब्ध होत आहे.

त्यातच वारकरी संप्रदायासाठी श्रद्धेचा विषय असलेल्या संत मुक्ताई मंदिरासाठी नुकतीच त्यांनी १५ कोटी निधी, मागील आठवड्यात मुक्ताईनगर, सावदा व बोदवड पाणीपुरवठा योजनांसाठी कोट्यवधी निधीसह मंजुरी आणली आहे.

सर्वांत मोठी उपलब्ध म्हणजे एमआयडीसीची असून, ६२५ एकर जमीन क्षेत्रावर मंजुरी व पहिला टप्पा १०० एकर जमीन क्षेत्र संपादित करण्याचे मागील महिन्यात मंजुरी घेतलेली आहे. दरम्यान, सुलवाडी ते मुंढोळदे (खडकाचे) हा पूल मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना शेती माल वाहतुकीसह दोन तालुके जवळ येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Talaq-e-Hasan Case: मुस्लिमांमध्ये तलाक-ए-हसन म्हणजे काय? ऐकून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशही संतापले, नेमकं प्रकरण काय?

Pune News : पुण्यात मनमानी खोदाईला ब्रेक! नियम मोडणाऱ्या ठेकेदाराचे काम मनपाने थांबवले; आधी रस्ते दुरुस्त करा, मगच पुढचे काम

Shubman Gill: अनफिट शुभमनला खेळवणार का? गुवाहाटी कसोटीसाठी भारतीय संघासमोर निवडीचा पेचप्रसंग

Latest Marathi News Update LIVE : : नागपूर जिल्ह्यातील कॅाग्रेसचा अंतर्गत संघर्ष टोकाला

Leopard Attack:'पती-पत्नीवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला'; कोपरगाव तालुक्यातील दाेघे गंभीर जखमी, अंगावर काटा आणणारा थरार !

SCROLL FOR NEXT