Jalgaon municipal commissioner Vidya Gaikwad latest news esakal
जळगाव

Jalgaon News : 14 कोटींतून किती रस्त्यांची कामे झाली? मनपा आयुक्तांनी मागविली पत्राद्वारे माहिती

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शासनाने शहरातील रस्ते कामांसाठी ४२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी १४ कोटींचा निधी देण्यात आला आहे.

त्या निधीतून किती कामे झाली आहेत, याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड (Vidya Gaikwad) यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास पत्र देवून मागितली असल्याचे सांगण्यात आले. (Municipal commissioner request information about road work funding through letter from construction department jalgaon news)

शासनाने जळगाव शहरातील ४९ रस्त्यांच्या कामासाठी ४२ कोटी रुपयांचा निधी महापालिकेला मंजूर केला आहे. मात्र, त्याचे काम शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. शासन महापालिकेला पैसे पाठवित आहे. महापालिका झालेल्या कामांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाला निधी देत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मक्तेदाराकडून काम करून घेत आहे.

रस्त्यांच्या कामासाठी आतापर्यंत महापालिकेने १४ कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा निधी मक्तेदारास दिला आहे. मक्तेदाराने त्या निधीतून रस्त्यांची कामे सुरू केली आहेत. निधी खर्च झाल्याने पुढील कामांसाठी मक्तेदाराने निधीची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकडे निधीची मागणी केली आहे, तर महापालिका शासनाकडे मागणी करणार आहे. मात्र, नवीन निधी देण्याअगोदर शासनाने १४ कोटींतून काय कामे झाले याची माहिती मागवित आहे.

त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी १४ कोटींच्या निधीतून किती कामे झाली याची माहिती द्या, असे पत्र दिले आहे. मात्र, अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या पत्रास उत्तर दिले नसल्याचे सांगण्यात आले.

याबाबत अधिक माहिती घेतली असता, मक्तेदाराने ४९ रस्त्यांपैकी ३५ रस्त्यांची कामे केली आहेत. त्यापैकी २७ रस्त्यांचे बीएमचे काम पूर्ण झाले आहे. त्यावर आता कारपेट टाकण्याचे काम बाकी आहे. आता पुढील काम करण्यासाठी त्यांना निधी आवश्‍यक असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, टपरीवर झाड कोसळून महिलेचा मृत्यू; नवश्या मारूती परिसरात दुर्घटना

Latest Marathi News Live Update : KDMC च्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे?

Income Tax: आयकर विभागाकडून सर्व 7 ITR फॉर्म जारी! कुणासाठी कोणता फॉर्म, ITR-U आणि ITR-V नेमकं काय समजून घ्या

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, घरांमध्ये शिरलं पाणी; काही ठिकाणी गारपीट

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

SCROLL FOR NEXT