construction  esakal
जळगाव

Jalgaon News: महापालिका क्षेत्रातील बांधकामे आजपासून 3 दिवस बंद राहणार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : दिवाळीनिमित्ताने वाढते प्रदूषण रोखण्यासाठी उद्या (ता. ११) पासून तीन दिवस महापालिका क्षेत्रातील बांधकाम बंद ठेवण्यात यावे, असे आदेश महापालिका आयुक्तांनी जारी केले आहेत. (Municipal construction will remain closed for 3 days from today jalgaon news)

दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे प्रदूषण होत असते. त्यात बांधकामाच्या धुळीमुळेही वाढ होते. त्यामुळे या काळात प्रदूषण रोखण्यासाठी बांधकाम बंद ठेवण्यात यावे, असे आदेश शासनातर्फे जारी करण्यात आले आहेत.

त्यामुळे महापालिकेतर्फेही शहरातील उद्या (ता.११) पासून सोमवार (ता. १३) पर्यंत बांधकामे बंद ठेवण्यात यावीत. शासन व न्यायालयाच्या निर्देशानुसार आदेशाचे पालन करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी केले आहे.

जास्त आवाजाचे फटाके जप्त

महापालिकेतर्फे प्रदूषण रोखण्यासाठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त डॉ. अश्‍वि‍नी भोसले यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले आहे.

त्यांनी आज शहरातील काही फटाके दुकांनाची तपासणी करून १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज करणारे फटाके तब्बल दहा दुकानातून जप्त केले आहेत. नागरिकांनी १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे फटाके फोडू नयेत, असे आवाहनही महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांनो लक्ष द्या! Meesho वरून खरेदी करता? तर आधी 'ही' बातमी नक्की वाचा; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Video: "मला नरेंद्र नावाचा तिरस्कार...", PM मोदींना भारतीय बॉक्सरने सांगितलेला पाकिस्तानी खेळाडूचा किस्सा ऐकून आवरेना हसू

Sugar Price: राज्यात साखरेचा तुटवडा, सणासुदीत भाव आणखी भडकण्याची शक्यता, किलोमागे किती मोजावे लागणार?

Samruddhi Mahamarg News: महामार्गावर नेमकं काय घडलं? RTO अधिकाऱ्यांनी केला मोठा खुलासा; म्हणाले, ''ट्रक चालकाने...''

Tukaram Mundhe: “चहा घेणार का? मी बनवतोय" FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ज्याच्यासाठी बनवला चहा तो मित्र कोण?

SCROLL FOR NEXT