jalgaon municipal corporation esakal
जळगाव

Jalgaon News : मुदत संपल्यामुळे गेलेला निधी महापालिकेला मिळाला परत

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : विकासकामांसाठी खर्च न झालेला महापालिकेचा निधी शासनाकडे जमा झाला होता. मात्र, आता हा निधी पुन्हा महापालिकेस प्राप्त होत आहे. आता १३ कोटींचा निधी मिळाला असून, टप्प्याटप्प्याने आणखी निधी मिळणार आहे. (municipal corporation get back lost funds due to expiry of term jalgaon news)

शहरातील विविध भागांत पेव्हर ब्लॉक बसविणे, आरसीसी गटारी तयार करणे, स्लॅब कलव्हटर टाकणे, रस्ते काँक्रिट करणे, रस्ते डांबरीकरण करणे, नाल्यास संरक्षण भिंत बांधणे, नाल्यावरील पूल बांधणे, अशा विविध कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून २०२०-२१ चा निधी वितरित करण्यात आला होता.

मात्र, या निधीला प्रशासकीय मान्यता उशिराने मिळाली व निविदा प्रक्रियेत सात ते आठ महिने लागल्यामुळे निधी खर्चाची मुदत संपली होती.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

मार्च २०२२ पर्यंत निधी खर्च न झाल्यामुळे यापैकी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गंत सहा कोटी व नागरी दलित्तेतर वस्ती सुधार योजनेंतर्गत सात कोटींचा निधी परत गेला होता. तो निधी आता टप्प्याटप्प्याने महापालिकेला पुन्हा मिळत असून, या निधीतून प्रस्तावित विकासकामांना गती मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake ₹500 Notes Seized : जळगावात सिनेस्टाईल थरार! बैलगाडीला धडक देऊन पळणाऱ्या कारमधून 500 रुपयांच्या नकली नोटा अन् तलवारी जप्त; 24 बंडले आढळल्याने गूढ वाढले

Akola: बोगस बियाण्यांवरून कृषी अधिकाऱ्यांना कक्षात डांबले; संतापाचा उद्रेक; शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन

Panchganga River Water level Update : पंचगंगेची पातळी सहा फुटांनी उतरली, इचलकरंजीतही पातळीत घट; कोल्हापुरात अद्याप 24 बंधारे पाण्याखाली, 41 मार्ग बंदच

Latest Marathi News Live Update : कागल तहसीलदारांना धमकी; पिंपळगाव खुर्दच्या एकाविरोधात गुन्हा

India A vs Nepal: BCCI चा मोठा निर्णय! भारत 'अ' संघ पहिल्यांदाच नेपाळ दौऱ्यावर; डिसेंबरमध्ये रंगणार ऐतिहासिक T20 मालिका

SCROLL FOR NEXT