jalgaon market 
जळगाव

जळगावातील १४ व्यापारी संकुलने उद्यापासून बेमुदत बंद 

भूषण श्रीखंडे

 
जळगाव : आधीच कोरोना काळातील लॉकडाउन तसेच ऑनलाइन खरेदीमुळे गाळेधारकाचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यात महापालिका गाळे सील करण्याची कारवाई करीत आहे. त्यामुळे कुठलाही पर्याय शिल्लक नसल्यामुळे महापालिकेच्या १४ व्यापारी संकुलातील गाळेधारक शुक्रवार (ता. ५)पासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहेत. मनपा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महापालिका मार्केट गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी दिला. 

दरम्यान, महापालिका उपायुक्तांनी पुन्हा मार्केटला भेट दिली. त्यांनी गाळेधारकांना पैसे भरण्यासाठी ८ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. डॉ. सोनवणे म्हणाले, की संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मंगळवारी आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त प्रशांत पाटील यांनी बोलविले. गाळेप्रश्नी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी अधिवेशनानंतर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. तोपर्यंत कारवाई करू नये, असे संघटनेतर्फे आयुक्तांना सांगण्यात आले होते. मात्र, मनपा प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने १४ मार्केटमधील दुकाने बंद करून दुकानदार आंदोलन करणार आहेत. त्या वेळी मनपाचे अधिकारी कारवाईसाठी आल्यास काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास मनपा प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा त्यांनी दिला.

लोकप्रतिनिधींनी वापर करून घेतला 
गाळेप्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आश्वासने दिली. तसेच आपल्या जाहीरनाम्यातही गाळेप्रश्न सोडविण्याचे सांगितले. मात्र, निवडणुकीसाठीच गाळेधारकांचा वापर करून त्यांना आता वाऱ्यावर सोडल्याचा संताप या वेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

गाळेधारकांवरच सक्ती का? 
राज्यात एकूण २७ महापालिकेचे मार्केट आहेत. त्यातील सर्व मार्केटमधील गाळेधारकांचे नूतनीकरण व जुने भाडे व इतर करांचा प्रश्न प्रलंबित आहे. मात्र, जळगाव मनपाद्वारे तब्बल २५० पट दंड लावला आहे. त्यामुळे प्रत्येक गाळेधारक ही रक्कम भरू शकत नाही. सर्वांना सवलती देतात. मग गाळेधारकांवरच सक्ती का, असा प्रश्नही या वेळी उपस्थित केला. 

ही मार्केट असणार बंद 
शहरातील महापालिकेच्या मालकीची अविकसित आणि अव्यवसायिक १४ मार्केट शुक्रवारपासून बेमुदत बंद राहणार आहेत. त्यात रामलाल चौबे मार्केट, भोईटे मार्केट, जुने बी. जे. मार्केट, डॉ. आंबेडकर मार्केट, वालेचा मार्केट, छत्रपती शाहू मार्केट, शिवाजीनगर दवाखान्याजवळील दुकाने, महात्मा गांधी मार्केट, भास्कर मार्केट, गेंदालाल मिल कॉम्प्लेक्स, श्‍यामाप्रसाद मुखर्जी उद्यानजवळील मार्केट, नानीबाई अग्रवाल मार्केट, जुने शाहू मार्केट, धर्मशाळा मार्केटचा समावेश आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT