जळगाव

कार्यादेश देऊनही मक्तेदाराची मुजोरी, रस्ते दुरुस्तीला अद्याप सुरवात नाही

सचिन जोशी

जळगाव : शहरातील रस्त्यांच्या डागडुजीसाठी प्रत्येक प्रभागात ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून मक्तेदारांना कामाचे कार्यादेश देऊनही काम सुरु झालेले नाही. अमृत योजना व भुयारी गटारांच्या कामामुळे रस्ते दुरुस्ती रखडली असून त्याबाबत महापौरांनी आज आढावा घेतला. 

अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा व भुयारी गटारांच्या कामामुळे दुरवस्था झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येक प्रभागासाठी मनपाने ५० लाखांचा निधी मंजूर केलेला आहे. प्रत्येक प्रभागासाठी मक्तेदार नेमण्यात आले असून त्यांना कार्यादेशही देण्यात आले आहेत. अद्यापही अनेक प्रभागात रस्त्यांची डागडुजी सुरू झालेली नसल्याने महापौर भारती सोनवणे यांनी आपल्या दालनात मनपा अभियंता आणि मक्तेदारांची बैठक घेतली. 
बैठकीस नगरसेवक कैलास सोनवणे, किशोर चौधरी, भारत सपकाळे, शहर अभियंता अरविंद भोसले यांच्यासह सर्व अभियंता आणि प्रभाग अधिकारी उपस्थित होते. 


अशी आहे प्रभागांची स्थिती 
रस्त्यांच्या डागडुजीच्या कामाचा आढावा घेतला असता प्रभाग क्रमांक १,२ मध्ये काम सोमवारी सुरू होईल. प्रभाग ३,४,५ मध्ये काम सुरू आहे. प्रभाग ६ मध्ये भूमिगत गटारांचे काम सुरू आहे. प्रभाग ७ मध्ये २-३ दिवसात काम सुरू होणार, प्रभाग १०, ११ मध्ये काम सोमवारी सुरू होणार, प्रभाग १२ मध्ये लवकरच काम सुरू होईल, प्रभाग १३, १४, १५, १६ मध्ये अमृत योजना, भूमिगत गटार काम सुरू, प्रभाग १७, १८ मध्ये भूमिगत गटारांचे काम बाकी असून प्रभाग १९ मध्ये अमृत योजनेचे काम बाकी असल्याची माहिती मक्तेदार आणि मनपा अभियंत्यांनी दिली. 

मक्तेदारांना नोटीस 
रस्ते दुरुस्तीबाबत वर्कऑर्डर देऊन १५ दिवस झाले आहेत. ज्या ठिकाणी काम सुरू करता येऊ शकेल परंतु अद्यापही करण्यात आलेले नाही त्या मक्तेदारांना नोटीस बजवावी, अशा सूचना महापौरांनी दिल्या. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 CSK vs RR : MS Dhoni च्या जागी कुणाला मिळणार Playing XI मध्ये संधी? 'या' २० वर्षीय खेळाडूचं नाव चर्चेत...

Kolhapur - Navi Mumbai Filght : कोल्हापूरच्या हवाई सेवेत नवा अध्याय; नवी मुंबईसाठी थेट उड्डाण सुरू

Jyotiba Chaitra Yatra 2026 : कामदा एकादशीच्या मुहूर्तावर चैत्र यात्रा सुरू; गुलाल-खोबऱ्याची उधळण, सीमाभागासह राज्यभरातील भाविक दाखल

UP industry Policy: UP मध्ये आता लायसन्स राज संपणार! छोट्या उद्योगांना योगी सरकारची मोठी भेट; 'या' सुविधेमुळे ५ वर्षे तपासणीतून मुक्ती

Dattatray Bharane : 'भोंदूबाबा-महाराज हे सगळं झूट, पोरांनो त्यांच्या नादाला अजिबात लागू नका'; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सल्ला

SCROLL FOR NEXT