जळगाव

जळगावकरांना होती शंका : महापौरांच्या उपस्थितीत भूमीगत गटारींच्या चेंबरच्या लोड टेस्टला सुरवात !

भूषण श्रीखंडे

जळगाव ः शहरात अमृत योजने अंतर्गत भूमीगत गटारींचे काम सुरू असून ठिकठिकाणी चेंबर तयार करण्यात आले आहे. भूमीगत गटारींच्या चेंबरचे काम दर्जाहीन असल्याच्या अनेक तक्रारी व गैरसमज नागरिकांच्या मनात होते. त्यानुसार नागरिकांचे गैरसमज दूर करण्यासाठी आज पासून चेंबरची लोड टेस्ट सुरू करण्याचे काम महापौर सौ. भारती सोनवणे यांच्या उपस्थितीत उपस्थितीत सुरू झाले. टेस्ट मध्ये चेंबरवर १७ टन वजनाचा भार तपासून पाहण्यात आला.

लोड टेस्टला कानळदा रस्त्यापासून सुरुवात करण्यात आली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, शहर अभियंता अरविंद भोसले, योगेश बोरोले, भूमीगत गटारीच्या कामाचे मक्तेदार प्रतिनिधी आणि अभियंता उपस्थित होते 

नागरिकांच्या मनात अनेक शंका, संभ्रम
भूमीगत गटारींच्या कामाबाबत जळगावकर नागरिकांच्या मनात अनेक शंका आणि संभ्रम आहे. चेंबरवर पाणी न मारणे, वीट न भिजवता वापरणे, पाणी न मारणे, प्लास्टर न करणे, सिमेंट, वाळू कमी जास्त असणे, चेंबरचे झाकण, रिंग कमकुवत आहे अशा अनेक शंका आणि संभ्रम नागरिकांच्या मनात आहे.

चेंबरने पेलली १७ टन क्षमता
भूमीगत गटारीसाठी गल्लोगल्ली चेंबर तयार करण्यात आले आहे. गल्लीतून शक्यतो अवजड वाहने जात नाही. तरीही चेंबरने १७ टन क्षमतेचा भार पेलला आहे. १७ टन क्षमता म्हण्जेज चेंबरहून ६८ टन वजनाचे वाहन जाऊ शकते. आजपर्यंत १० चेंबरची तपासणी पूर्ण झाली असून दररोज ५ चेंबर तपासले जाणार आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Balumama Temple Kolhapur : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बाळूमामा मंदिर तीन मार्चपासून बंद राहणार

Maharashtra Railway Project : महाराष्ट्रात नवा रेल्वे प्रकल्प ! ५,४०० गावांना जोडणारा २३१ किलोमीटरचा रेल्वे मार्ग मंजूर

Paithan Accident: कालव्यातील तिघांचा लागेना ठावठिकाणा; चांगतपुरीजवळ रात्री कोसळली होती कार, शोधमोहीम सुरूच..

Latest Marathi News Live Update : नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीदरम्यान पत्रकारांवर अन्याय

Kolhapur MSEDCL : कृषिपंपांची बनावट वीज बिल थकबाकी शेतकऱ्यांच्या माथी; राज्य इरिगेशन फेडरेशनचा आरोप

SCROLL FOR NEXT