Nahvi rural hospital waiting for medical officers. esakal
जळगाव

Jalgaon News : न्हावी ग्रामीण रुग्णालय डॉक्टरांअभावी वाऱ्यावर; तीन महिन्यांपासून गैरसोय

रोज अडीचशे, तीनशे ओपीडी येथे होतात. परंतु वैद्यकीय अधिकारी डॉ. कौस्तुभ तळेले प्रशिक्षणाला गेल्यानंतर न्हावी ग्रामीण रुग्णालयास वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथे ग्रामीण रुग्णालयात गेल्या तीन महिन्यांपासून वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे वाऱ्यावर असून, परिसरातील याचा फटका रुग्णसेवेला बसला आहे.

वाढत्या थंडीमुळे सर्दी, खोकल्याचा त्रास वाढत आहे. (Nahvi Rural Hospital is suffering from lack of doctors jalgaon news)

न्हावी ग्रामीण रुग्णालय ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय आहे. या परिसरात न्हावी, मारूळ, बोरखेडा, साखर कारखाना, फैजफूर हंबर्डी, आमोदा येथून नागरिक वैद्यकीय तपासणीसाठी येत असतात.

रोज अडीचशे, तीनशे ओपीडी येथे होतात. परंतु वैद्यकीय अधिकारी डॉ. कौस्तुभ तळेले प्रशिक्षणाला गेल्यानंतर न्हावी ग्रामीण रुग्णालयास वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे.

उपस्थित कर्मचारी, परिचारिका त्यांच्या पातळीवर माहितीप्रमाणे आलेले ड्रेसिंग, प्रथमोपचार, टी.टी. इंजेक्शन अशा प्रकारचे आम्ही प्राथमिक उपचार करतो, असे उपस्थित असलेल्या परिचारिकांनी सांगितले व डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय आम्ही औषधी देऊ शकत नाही.

गावात सर्दी, खोकल्याची साथ सुरू आहे. परंतु डॉक्टर नसल्याने रुग्णांचे गैरसोय होत आहे. ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी डॉक्टर नसल्यामुळे औषधी देत नाहीत. गेल्या तीन महिन्यांपासून इंटर्नशिपवर आलेले डॉक्टर ओपीडी करून औषधोपचार करीत होते.

पण गेल्या तीन दिवसांपासून हे ‘ट्रेनिंग’ला गेलेले डॉक्टरही ट्रेनिंग संपल्यामुळे कुठलाही वैद्यकीय अधिकारी नाही.

खासगी रुग्णालयाचा भुर्दंड

ग्रामीण रुग्णालयात गेल्यानंतर सर्दी, खोकला, ताप असल्यामुळे उभे राहता येत नव्हते. सोबत माझे पती होते. प्रसंगी वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे परिचारिका औषधी देऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले.

त्यामुळे आम्हाला दुसऱ्या खासगी दवाखान्यात जाण्यास सांगितले. आमच्यासोबत उपस्थित असलेले रुग्णांना देखील खाली हात परतावे लागले, असे ग्रामीण रुग्णालय समिती सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्य रूपाली विश्वनाथ यांनी सांगितले.

"न्हावी ग्रामीण रुग्णालयात दोन - तीन दिवसांपासून दररोज मागणी सुरू आहे. परंतु शल्यचिकित्सक दोन दिवस मुंबईला असल्यामुळे अधिकाऱ्याची निवड करता येत नाही. लवकरच अधिकारी नेमण्याची व्यवस्था करू."- विजय कुरकुरे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VD Satheesan Kerala CM : केरळला नवे नेतृत्व; काँग्रेसकडून व्ही. डी. सथीसन यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती

ACB Bribe Arrest : पुण्यानंतर आता नवी मुंबईत 'एसीबी'चा मोठा दणका; सिडकोचे अप्पर जिल्हाधिकारी 22 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटकेत

ChatGPT ने एका रात्रीत बनवून टाकलं करोडपती! केली 631 अब्ज रुपयांची कमाई, काय होती ट्रिक? पाहा

IPL 2026: विकेट तर गेलीच, पण सोन्याची चैनही पडली! RCB च्या ओपनरसोबत घडला अजब प्रकार अन् मग पडिक्कलने दाखवलं वेळेचं भान

Chandrakant Patil on Jayant Patil : सांगली-पेठ रस्ता न करणारे ‘शक्तिपीठ’ महामार्गावर बोलत आहेत, चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटलांचा घेतला समाचार

SCROLL FOR NEXT