arres sakal
जळगाव

नंदुरबार : चोरीच्या गुन्ह्यातील तीन संशयित गजाआड

नंदुरबार उपनगर, तालुका पोलिस ठाण्यात दाखल होते गुन्हे

राजेश नागरे

नंदुरबार : नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यांतर्गत कोठली ता. नंदुरबार व तालुका पोलिस ठाण्यांतर्गत घोटाणे ता.नंदुरबार या दोन्ही धाडसी चोरीच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. २९ मार्चला रात्री साडेअकरा ते पहाटे पाचच्या सुमारास उपनगर पोलिस ठाणे हद्दीतील कोठली गावातील शशिकांत अरविंद पाटील यांच्या शेतातील घरातील २७ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल, ५० हजार रुपये रोख चोरीस गेले होते. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा झाला होता.

दुसऱ्या घटनेत ९ मार्चला घोटाणे (ता.नंदुरबार) येथील तुळशीराम दगा पाटील यांच्या घराजवळ लावलेली दुचाकी, तीन हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरी झाले होता. नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक निलगिरी सर्कल लिंबायत सुरत गुजरात येथे रवाना झाले.

जामदा (ता. साक्री) येथील व सध्या सुरत येथे वास्तव्यास असलेले धर्मा भोसले व नानु डींग भोसले यांनी (ता.नंदुरबार) घोटाणे चोरी केली आहे. पथकाने सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी मुद्देमाल काढून देत गुन्हा कबूल केला. कोठली येथील चोरी वेडापावला (ता.नंदुरबार) येथील अक्षय शांतू वळवी याने केल्याची माहिती मिळाली. पथकाने वेडापावला येथून अक्षय शांतू वळवी यास ताब्यात घेतले. त्याने

चोरीची कबुली देत २७ हजार किमतीचे तीन मोबाईल हॅन्डसेट काढून दिले. त्यास अटक केली आहे.पोलिस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली दोन्ही गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर करीत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: पंजाब किंग्सचा सलग चौथा पराभव; दिल्ली कॅपिटल्सने Playoff चे गणित बिघडवले; CSK, KKR, RR ला संधी...

Big News: राहुल द्रविड बनला ट्वेंटी-२० संघाचा मालक; भारताशिवाय 'ज्या' देशाकडून खेळलेला, तिथेच युवा टॅलेंट शोधण्यासाठी परतला...

Operation Clean: अवैध मद्यनिर्मितीविरोधात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राज्यभर ‘ऑपरेशन क्लीन’ सुरू; कायदा आणखी कडक

Iran Peace Proposal: मिडल ईस्टमध्ये शांततेची शेवटची आशा संपली? अमेरिकेने इराणचा प्रस्ताव फेटाळला; तेलाच्या किंमतीत वाढ

Mumbai Local: मुंबई लोकल वाहतूक विस्कळीत, काही फेऱ्या रद्द; अनेक गाड्या २० मिनिटांपर्यंत उशिराने

SCROLL FOR NEXT