Nasir Tadvi save life of pregnant women jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News: रस्त्यात महिलेची प्रसूती अन् नासीर बनले देवदूत! आदिवासी भागातील आरोग्य यंत्रणेचा प्रश्न चव्हाट्यावर

सकाळ वृत्तसेवा

गणेश भोई : सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : मजुरीसाठी जाणाऱ्या गर्भवती महिलेसाठी येथील नासीर तडवी व त्यांचे मित्र देवदूत बनून आले. रस्त्यातच महिलेची प्रसूती झाल्यावर तिला तत्काळ रुग्णालयात नेत महिलेसह बाळाचा जीव वाचविला.

बाळ आणि बाळांतीळ सुखरूप आहे. मात्र या प्रकारामुळे सातपुड्यातील दुर्गम आदिवासी भागातील आरोग्याच्या समस्या किती बिकट आहेत याची या घटनेवरून प्रचिती येते. आदिवासी भागात दूर दूर पर्यंत आरोग्य सुविधांचा लवलेशही दिसून येत नाही. याचा शासकीय यंत्रणेने गांभीयनि विचार करण्याची गरज आहे. (Nasir Tadvi save life of pregnant women jalgaon news)

सातपुड्यातील पिंपरकुंड या दुर्गम भागातील गीता मुन्ना बारेला (वय ३०) आदिवासी महिला व त्यांचे कुटुंब मजुरी कामासाठी वास्तव्यास निंभोरा येथे आहे. पिंपरकुंड येथून निंभोरा येथे जात असताना पाल बसस्थानकासमोर या महिलेला प्रसूतीच्या वेदना जाणवू लागल्या. या महिलेसोबत तिची सासू होती.

सोबत माणूस नसल्यामुळे आता करावे, असा प्रश्न महिलेच्या सासूबाईला पडला. तितक्यात त्यांनी बसस्थानक आवारात समोरच उभ्या असलेल्या नासीर तडवी या युवकाला हाक दिली. या वेळी नासीर व त्यांचे मित्र भिकारी तडवी, रौनक तडवी, यांनी थोडाही विलंब न करता या गरीब आदिवासी महिलेला ग्रामीण रुग्णालयात खासगी वाहनाने घेऊन जात असताना रस्त्यातच महिलेचीप्रसूती झाली व या महिलेने लहान गोड मुलीला जन्म दिला.

या युवकांनी लागलीच महिलेला ग्रामीण रुग्णालयात नेले असता तेथे आधिपरिचारक विश्वास सुधाकर राव यांनी महिलेची व बाळाची तपासणी करून बाळाच्या नाकातोंडातील संपूर्ण घाण साफ केली व प्रसूतीमुळे महिलेला रक्तस्त्राव सुरू होता.

त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून बाळाला व आईला योग्य औषधोपचार करून योग्य ते उपचार दिले व या आदिवासी महिलेचे प्राण वाचवले.

येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या एक महिन्यापासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांचे हाल होत असून, येथे त्वरित वैद्यकीय अधिकारी नेमणूक करून द्यावी असेआदिवासी एकता मंचाचे तालुकाध्यक्ष सलीम तडवी यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. कारण या ग्रामीण रुग्णालयाला एकूण परिसरातील पंधरा- सोळा आदिवासी पाडे लागून असू येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी असावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

दरम्यान, सातपुड्याच्या आदिवासी भागातील आरोग्य यंत्रणा खिळखिळी झाली असून, आरोग्य विभागातील अनेक पदे रिक्त असल्याने तेथील रुग्णांना वेळेवर चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा मिळत नसल्याची ओरड कायमच होत असते. परंतु आरोग्य विभागाकडून या समस्यांकडे डोळेझाक केली जात असल्याचे वास्तव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT