sharad pawar on hasan mushrif esakal
जळगाव

शेतकरी भीक नाही, तर कष्टाची किंमत मागतोय; शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल

कार्तिक पुजारी

NCP chief sharad pawar in jalgao rally

जळगाव- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आज जळगावमध्ये आले आहेत. यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. सभेला संबोधित करताना त्यांनी भाजपवर टीका केली. शेतकरी भीक नाही कष्टाची किंमत मागत असतो. पण, सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. भाजप पक्षांच्या फोडाफोडीचे राजकारण करत आहे. शिवसेना फोडली. सत्तेचा गैरउपयोग होत आहे, असं म्हणत त्यांनी टीका केली.

पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली. पंतप्रधान मोदींनी ९ वर्षात काय केलं. त्यांनी फोडाफोडीचं राजकारण केलं. नवाब मलिक यांना तुरुंगात टाकण्यात आलं. काही कारण नसताना मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. स्त्रियांना जखमी करण्यात आले. लहान मुलांना मारहाण करण्यात आली, असं म्हणत त्यांनी मराठा आंदोलनावर भाष्य केलं.

सर्व देशामध्ये पाणी साठा कमी झाला आहे. शेतकरी अडचणीत आला आहे. जनावरांना, रानामध्ये पाणी नाही. दुहेरी पिकं करुनही फायदा झाला नाही. ही स्थिती बदलायची आहे. राज्यकर्ते यांची इच्छाशक्ती असेल तर परिस्थिती बदलू शकते. पण, सध्याचे जे सरकार आहे, त्यांना शेतकऱ्यांची चिंता नाही. चुकीच्या लोकांच्या हातात राज्य गेलं आहे, असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली.

यवतमाळमध्ये १५ दिवसांत २० लोकांनी आत्महत्या केली. शेतकरी कष्ट करणारा आणि घाम गाळणारा आहे. पण, त्याची किंमत सरकार करत नाही. नाशिकचा कांदा अडचणीत आहे. त्यामुळे काहीतरी करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी लाचार नाही, भीक मागत नाही. कष्टाची किंमत मागतो. ते मिळत नसेल तर संघर्ष करावा लागेल, असं ते म्हणाले

पंतप्रधान मोदींनी नऊ वर्षात काय केलं? फक्त फोडाफोडी केली. शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. फोडाफोडीचं राजकारण केवळ हीच गोष्ट केली. सीबीआय, ईडींचा वापर विरोधकांना दाबवण्यासाठी करायचा. अनेकांना विनाकारण तुरुंगात टाकले. नवाब मलिकांना तुरुंगात टाकले, असं म्हणत पवारांनी टीका केली. लोकांवर लाठीचार्ज करणाऱ्या सरकारला सत्तेत राहू द्यायचं नाही, असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT