जळगाव

जयंत पाटीलांनी स्व.हरिभाऊ जावळेंच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट 

सचिन जोशी

जळगाव : परिवार संवाद यात्रेला निघालेल्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी आज यावल तालुक्यातील भालोद गाव गाठत स्व. हरिभाऊ जावळेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. शेती आणि शेतकऱ्यांसाठी नेहमीच आग्रही असलेल्या हरिभाऊंबद्दल पाटलांनी भावनाही व्यक्त केल्या. 

जयंत पाटील राज्यात परिवार संवाद यात्रेवर असून ते सध्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी फैजपूर येथील कार्यक्रमानंतर त्यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसेंसह भालोद गावी जाऊन हरिभाऊंच्या कटुंबियांची भेट घेतली. हरिभाऊंच्या पत्नी श्रीमती कल्पना, पुत्र अमोल यांच्याशी त्यांनी चर्चा केली. हरिभाऊंच्या विधानसभेतील स्मृतींना उजाळा देत शेती व शेतकऱ्यांसाठी हरिभाऊंनी नेहमीच महत्त्वाचे मुद्दे सभागृहात मांडल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार मनीष जैन, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, जळगाव महानगराध्यक्ष अभिषेक पाटील आदी उपस्थित होते. 

आवर्जून वाचा- शौर्य गाजवूनही शासनाकडून बेदखल; अजून ही कायम नोकरीच्या शोधात


शेळगाव बॅरेज, मेगारिचार्ज स्कीम 
यावलसह भुसावळ व चोपडा तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या तापी नदीवरील शेळगाव बॅरेज व मेगा रिचार्ज स्कीम हे हरिभाऊंचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे अमोल जावळेंनी जयंत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. जलसंपदा मंत्री म्हणून या कामात लक्ष घालून जिल्ह्यासाठी वरदान ठरणाऱ्या या प्रकल्पांचे काम मार्गी लावावे, अशी अपेक्षाही उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद होणार, गणेशोत्सवासाठी प्रशासनाची खबरदारी

Women’s Asia Cup 2026: टीम इंडिया जिंकली तर पुन्हा होणार ‘ट्रॉफी ड्रामा’? मोहसिन नक्वी फायनलमध्ये येणार, गेल्या वर्षाची आठवण ताजी

Marathi News Live Updates : आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा - आमदार गोपीचंद पडळकर

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर उपायासाठी हालचालींना वेग; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला गती

शिंदेंसेनेच्या नेत्याचा रुग्णालयात राडा! बिलावरून वाद, कर्मचाऱ्याला शिवीगाळ अन् मारहाण करत...; पालघरमध्ये काय घडलं?

SCROLL FOR NEXT