जळगाव

गट-तट विसरा आणि कामाला लागा; यश निश्चीत मिळेल !

आनंन शिंपी

चाळीसगाव : दोन विधानसभेत मागील काळात चाळीसगाव तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाला मोठा फटका बसला आहे. चाळीसगाव तालुक्यात राजीव देशमुखांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्याबद्दल सहानुभूती देखील आहे परंतु ही सहानुभूती मतात मांडण्यात अपयश आले असून यामुळे पक्षाला पराभव पत्करावा लागला आहे. यामुळे पुढील तीन वर्षात पक्ष मजबूत करून सहानुभूतीचे रुपांतर मतांमध्ये मांडले तर आगामी विधानसभा ची जागा ही राष्ट्रवादीचीच असेल असे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मांडले.

चाळीसगाव शहरातील लक्ष्मी नगर स्थित राजपूत मंगल कार्यालयात राष्ट्रवादी परिवार संवाद मेळावा आज झाला. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी आमदार राजीव देशमुख, राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

कार्यकर्त्यांना उभे करणे गरजेचे
तालुक्यात असलेल्या बुथ वाईज कमिट्या सक्षम करून राजकारणात बसलेला फटका दूर करणे सध्या गरजेचे आहे. सुदैवाने राज्यात आपण सत्तेत असल्याने कार्यक्षम कार्यकर्त्यांना उभे करण्याची आज गरज आहे. पक्षांतर्गत चर्चा होऊन सुधारणा करण्यासाठी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचेही यावेळी नामदार जयंत पाटील यांनी सांगितले.

विकास कामांचा आढावा घेतला

कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी तळागाळापर्यंत जाउन माणसे जोडली पाहिजेत. चाळीसगाव तालुका हा गुटका दारु यासह अनेक अवैद्य धंदे देखील बोकाळले असून यात येथील राजकारणात सक्रिय लोकप्रतिनिधींचा सहभाग आहे. यामुळे राष्ट्रवादी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याकडे लक्ष देऊन प्रशासन व सहकारात समन्वय साधणे गरजेचे असल्याचे मत यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले. यावेळी माजी आमदार राजीव देशमुख यांनी चाळीसगाव तालुक्यात यांच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांचा आढावा घेतला.

पदाधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती
राष्ट्रवादी परिवार संवाद मेळाव्याप्रसंगी नामदार जयंत पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी यांची कमिटी वाईस विचारणा करून चांगलीच झाडाझडती घेतली. सदस्य संख्या व उपस्थिती यावर भर देऊन पक्ष संघटना बाबत काय नेमकी स्थिती आहे ही बाब या पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. माहिती देण्यासाठी अनेक पदाधिकारी असक्षम ठरल्याने त्यांची चांगलीच भंबेरी उडाली दिसून आली.
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: पत्रकार परिषदेपूर्वीच जय पवार बोलले! विमान अपघाताची अधिवेशनात चर्चा का नाही? दिलं उत्तर

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

Uruli Kanchan Fraud News : प्लॉट विकत देतो म्हणून बुकिंग पोटी ५ लाख घेतले, खरेदीखत न करता फसवणुक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावे घरकूल घोटाळा, जलील यांचा आरोप

Team India Cricket Schedule: २० वन डे, २१ ट्वेंटी-२०, १० कसोटी अन् Asian Games; भारताचे पुढील १२ महिन्यांचे क्रिकेट कॅलेंडर

SCROLL FOR NEXT