New fire alarm system at 15 places in Bhusawal division
New fire alarm system at 15 places in Bhusawal division esakal
जळगाव

Jalgaon News : भुसावळ विभागात 15 ठिकाणी नवीन फायर अलार्म सिस्टम

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : रेल्वे गाड्या सिग्नलवर चालतात. ती यंत्रणा अद्ययावत असल्याने रेल्वेचे अपघात टळतात. यामुळेच भुसावळ रेल्वेच्या सिग्नल, दूरसंचार विभागााने सिग्नलिंग गिअर्सची विश्वासार्हता सुधारण्यासाठी भुसावळ विभागात १५ ठिकाणी नवीन फायर अलार्म सिस्टम बसविली आहे. (New fire alarm system at 15 places in Bhusawal division jalgaon news)

रेल्वेत सिग्नल आणि दूरसंचार विभाग महत्त्वाचा आहे. या विभागाचे वरिष्ठ विभागीय सिग्नल व दूरसंचार अभियंता विजय खांची यांच्या नेतृत्वाखाली व भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. एस. केडिया यांच्या मार्गदर्शनाखाली सिग्नल व दूरसंचार विभाग तंत्रज्ञानात अग्रेसर आहे. या क्षेत्रात मोठी कामगिरी २०२२-२३ आर्थिक वर्षात झाली आहे.

पावसाळ्यातील पुरापासून संरक्षण करण्यासाठी रूळांवर नवीन वॉटरप्रूफ पॉइंट मोटर्स बसविण्यात आल्या. भुसावळ विभागात ३६ नवीन ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. भुसावळ मंडलातील आठ पीआरएस आरक्षण स्थानकांवर ६४ केबीपीएस बीएसएनएल लीज सर्किट दोन एमबीपीएसवर श्रेणी सुधारित करण्यात आली.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

त्र्यंबकेश्वरला पीआरएस, मालेगावला पीआरएस, बुलढाणा येथे पीआरएस, अचलपूरला पीआरएस, यवतमाळला पीआरएस, कारंजा येथे पीआरएस, आर्णी पोस्टला पीआरएस, इरटीन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अंतर्गत नाशिकला पीआरएस सिस्टीम बसविण्यात आली आहे. नवीन संगणकीकृत एफओआयएस प्रणाली दोन मालशेडमध्ये मालवाहतूक ऑनलाइन बुकिंग आणि पेमेंटसाठी प्रदान केली. यात चाळीसगाव गुड्स शेड व बुरहानपूर गुड्स शेड यांचा समावेश आहे.

भंगार विक्रीतून ८६ कोटी

भुसावळ विभागातील स्टोअर्स विभागप्रमुख कार्तिकेय गडाख आहेत. ते वरिष्ठ विभागीय साहित्य व्यवस्थापक आहेत. २०२२-२३ वर्षातील स्टोअर्स विभागाची प्रमुख कामगिरी अशी : भंगार विल्हेवाटीने एकूण ८६.३ कोटी कमावले. रेल्वेच्या वापरासाठी आवश्यक असलेल्या ७० टक्का सामग्रीची खरेदी ऑनलाइन जीईएम (गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस) द्वारे करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर हळहळलं! खरेदीसाठी गेल्या जवानांवर काळाचा घाला, भीषण अपघातात दोंघाचा मृत्यू; ऑटोचालकासह सहा जवान गंभीर जखमी

Shikhar Dhawan: लेकाच्या विरहानं शिखर व्याकुळ; फादर्स डेच्या शुभेच्छा देताना म्हणाला, 'त्याच्याशी बोललो नाहीये...'

Jerusalem : दिवसाउजेडी हल्ले थांबवणार; गाझातील मदतकार्याच्या सोयीसाठी इस्राईलकडून घोषणा

Russia-Ukraine Conflict : ‘युक्रेन’बाबत स्वित्झर्लंडमध्ये बैठक; रशियाच्या अनुपस्थितीने तोडग्याची शक्यता कमीच

Prataprao Chikhlikar: मनोज जरांगेंची हवा नांदेडपर्यंत...! प्रतापराव चिखलीकरांचा गेम कसा झाला?

SCROLL FOR NEXT