crime sakal
जळगाव

निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे कीर्तन पडले चांगलेच महागात

कोरोना प्रादुर्भावाची श्क्यता आणि वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन करून प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे कीर्तन आयोजीत करणाऱ्या आयोजकाला चांगलेच महागात पडले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव)- कोरोना प्रादुर्भावाची श्क्यता आणि वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन करून प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे कीर्तन आयोजीत करणाऱ्या आयोजकाला चांगलेच महागात पडले आहे. सायगाव (ता. चाळीसगाव) येथील आयोजकाच्या विरोधात मेहूणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे

या घटनेची मेहूणबारे पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, सायगाव, (ता. चाळीसगांव) येथे (ता. 21) रोजी सायगाव ते नांदगाव रोड लगत असलेल्या मोकळ्या पटांगणात सार्वजनिक जागी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याची माहिती असुन देखील ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन सोहळ्याचे जाणीवपूर्वक रात्री उशिरापर्यंत आयोजन केले व वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन करून जनसमुदाय जमवला. तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांचे कडील आदेशाचे उल्लंघन केले आणि लोकांचे जीवितास धोका असलेल्या कोरोना रोगाचा संसर्ग पसरविण्याची घातक कृती केली म्हणुन पोलीस नाईक सिध्दांत शिसोदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुधाकर पाटील यांच्या विरोधात मेहूणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा तपास ,साहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये पुन्हा हाहाकार! गंडकी नदीला अचानक पूर, घरं-पूल गेले वाहून; पहाटे नागरिकांचे स्थलांतर, बचावकार्य सुरू

IND vs NZ ODI Series: भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंचं पुनरागमन, पाहा संपूर्ण स्क्वॉड

IND W vs ZIM W: भारत-झिम्बाब्वे महिला क्रिकेट मालिकेचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठे रंगणार टी-२० आणि वनडे सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक

BEST Bus Stop: प्रवाशी वाऱ्यावर, बेस्टच्या बस थांब्यात फ्लिपकार्टचं दुकान;वांद्र्यातला धक्कादायक प्रकार

VIRAL VIDEO: ‘रीटेक्सपासून रासपर्यंत’; ऐश्वर्या नारकर यांचा गरबा पाहिलात का? नेटकरी म्हणाले…

SCROLL FOR NEXT