Jalgaon: Poet Bahinabai Chowdhury officials of the University Development Forum cheering with the winning candidates from the management representatives (organizational group) in the election of various authorities of North Maharashtra University
Jalgaon: Poet Bahinabai Chowdhury officials of the University Development Forum cheering with the winning candidates from the management representatives (organizational group) in the election of various authorities of North Maharashtra University esakal
जळगाव

NMU Authority Election : संस्थाचालक गटात ‘विद्यापीठ विकास’ चे वर्चस्व

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर व्यवस्थापन प्रतिनिधींमधून नंदकुमार बेंडाळे, संजय पाटील, निशांत रंधे, विलास जोशी हे निवडून आले. याद्वारे संस्थाचालकांच्या गटात विद्यापीठ विकास मंचचे वर्चस्व सिद्ध झालेय.

विद्यापीठ अध्यापकांमधून प्रा. कीर्ती कमलजा, प्रा. विशाल पराते, प्रा. अजय पाटील महाविद्यालयीन अध्यापकांमधून प्रा. वर्षा पाटील, प्रा. सुरेखा पालवे आणि प्राचार्यांमधून संजय सुराणा, एस.एन. भारंबे, किशोर पाटील, सुनील पाटील, वासुदेव पाटील हे निवडून आले आहेत.

याशिवाय विद्यापरिषदेवर पराग नारखेडे व महेंद्र रघुवंशी हे निवडून आले. सायंकाळी उर्वरित जागांची मतमोजणी सुरू होती. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी विद्यापीठ कॅम्पसमध्ये निकाल कळताच जल्लोष केला. (NMU Authority Election Dominance of University Development in Institutional Group Win Jalgaon News)

विद्यापीठ भवनात मंगळवारी (ता.१०) सकाळी १० वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ झाला. झालेले मतदानातून अवैध मते बाजूला काढून वैध मतांच्या आधारे विजयाचा कोटा ठरविण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रक्रिया सुरु झाली व एकेक निकाल जाहीर झाले.

अध्यापक महिला गट

या गटाचा पहिला निकाल हाती आला. विद्यापीठ शिक्षकांमधून अधिसभेसाठी ३ जागा आहेत. त्यातील अनुसूचित जमाती संवर्गात ५६ पैकी ५५ मते वैध ठरली. प्रा. विशाल पराते यांना ३१ मते प्राप्त झाली तर प्रा. राजकुमार सिरसम यांना २४ मते प्राप्त झाल्यामुळे प्रा. विशाल पराते यांना विजयी घोषित करण्यात आले.

महिला संवर्गात प्रा. कीर्ती कमलजा यांना ३४ तर प्रा. पवित्रा पाटील यांना २१ मते प्राप्त झाली. एक मत अवैध ठरले. प्रा. कीर्ती कमलजा यांना विजयी घोषित करण्यात आले. खुल्या संवर्गात ३ उमेदवार होते त्यासाठी २९ मतांचा कोटा निर्धारित करण्यात आला. प्रा. अरुण इंगळे यांना २५, प्रा. अजय पाटील यांना ३१ तर डॉ. सुधीर भटकर यांना शून्य मते प्राप्त झाली. या संवर्गात प्रा. अजय पाटील हे विजयी ठरले.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

व्यवस्थापन प्रतिनिधी

संस्थाचालकांच्या म्हणजे व्यवस्थापन प्रतिनिधींच्या गटात खुल्या संवर्गामधून ४ जागांसाठी ६ उमेदवार रिंगणात होते. विजयासाठी १६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. सर्व ७९ मते वैध ठरली. पहिल्या नंदकुमार बेंडाळे (केसीई संस्था, जळगाव) आणि संजय पाटील (एसएसव्हीपीएस संस्था, धुळे) यांना १८ मते मिळाल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यानंतर मते हस्तांतरित प्रक्रियेद्वारे निशांत रंधे (किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर) यांनी चौथ्या फेरीत १८ मते प्राप्त केल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

विलास जोशी (पाचोरा तालुका को-ऑप शिक्षण संस्था, पाचोरा) यांना पाचव्या फेरी अखेर १५ मते प्राप्त झाली असली तरी विजयी घोषित करण्यात आले. व्यवस्थापन प्रतिनिधींमधून अनुसूचित जमाती संवर्गातून भरत माणिकराव गावित (विसरवाडी शिक्षण संस्था, विसरवाडी) आणि महिला राखीवमधून दीपिका अनिल चौधरी (सोशल – कल्‍चरल असो. कुसुंबे, धुळे) हे दोघेही आधीच बिनविरोध निवडले आहेत.

प्राचार्य गट (१० जागा)

महिला राखीव संवर्गातून प्राचार्य वैशाली पाटील (आर. सी. पटेल इन्स्टी. ऑफ मॅनेजमेंट, शिरपूर) आणि इतर मागासवर्ग संवर्गातून प्राचार्य सुनील पंडित पवार (पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक संस्थेचे फार्मसी महा. शहादा) हे बिनविरोध निवडून आले आहेत. खुल्या संवर्गात ५ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात होते. निवडून येण्यासाठी १० मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. ५६ पैकी ५४ मते वैध ठरली दोन मते अवैध ठरली.

प्राचार्य एस. एन. भारंबे (मु. जे. महाविद्यालय, जळगाव) यांना १० मते, प्राचार्य संजय सुराणा (आर. सी. पटेल इन्स्टी. ऑफ फार्मा., शिरपूर) यांना ११ मते, प्राचार्य के. बी. पाटील (कला, वाणिज्य व विज्ञान महा., सोनगीर) यांना १० मते प्राप्त झाली. या तिघांनी पहिल्या फेरीतच निर्धारित कोटा प्राप्त केल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले. तिसऱ्या फेरीत प्राचार्य वासुदेव पाटील (गरुड महा. शेंदुर्णी) यांना १० मते आणि प्राचार्य सुनील पाटील (कला महा. बामखेडा) यांना ८ मते पडली आणि त्यांना विजयी घोषित करण्यात आले. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती/भटक्या जमाती या तीन संवर्गातील पदे रिक्त राहिली आहेत.

महाविद्यालयीन अध्यापक (१० जागा)

महिला राखीव संवर्गात प्रा. इंदिरा पाटील आणि प्रा. वर्षा पाटील यांच्यात लढत होती. १७५२ पैकी १६७९ मते वैध ठरली तर ६३ मते अवैध ठरली. ८४६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. प्रा. वर्षा पाटील या ९४६ मते घेऊन विजयी झाल्या. प्रा. इंदिरा पाटील यांना ७४३ मते प्राप्त झाली. विमुक्त जाती/भटक्या जमाती संवर्गात एका जागेसाठी चार उमेदवार होते. यामध्ये ९४२ मते घेऊन प्रा. सुरेखा पालवे विजयी झाल्या. त्यांचे प्रतिस्पर्धी प्रा. धीरज वैष्णव यांना ५७०, प्रा. नामदेव गर्जे यांना १०९, तुषार राजळे यांना ८० मते प्राप्त झाली. या गटात १७५२ पैकी ५१ मते अवैध ठरली.

विद्यापरिषद व विद्याशाखा

विद्यापरिषदेवर वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतून दोन जागा आहेत. पैकी अनुसूचित जाती संवर्गातून प्रा. रमेश सरदार हे बिनविरोध निवडून आले आहेत तर खुल्या संवर्गात १ जागेसाठी ३ उमेदवार होते. यात प्रा. पराग नारखेडे ९७० मते घेऊन विजयी झालेत. प्रा. आर. आर. चव्हाण यांना १६५, प्रा. मधुलिका सोनवणे ६११ मते प्राप्त झाली. मानव विज्ञान विद्याशाखेतून विद्या परिषदेवर दोन जागा निवडून द्यावयाच्या आहेत. त्यापैकी खुल्या संवर्गातून महेंद्र रघुवंशी हे ९९९ मते घेऊन विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी प्रा. अविनाश बडगुजर यांना ७२३ मते प्राप्त झाली. या गटात १८०७ पैकी ९४ मते अवैध ठरली.

रात्री उशिरापर्यंत मतमोजणी

या वेळी प्रथमच विद्यापीठाने मतमोजणीच्या प्रक्रियेत महिला कर्मचाऱ्यांना सहभागी केले. विजयी उमेदवारांना कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यावेळी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विभाग प्रमुख इंजि. आर. आय. पाटील, डॉ.मुनाफ शेख, फुलचंद अग्रवाल तसेच विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

Mahadev Betting App: महादेव बेटींग अ‍ॅप प्रकरणी आणखी एका अभिनेत्याला अटक

IPL 2024: ईशान किशनला BCCI चा दणका, दिल्ली-मुंबई सामन्यानंतर केली मोठी कारवाई

Antarctica Penguin : ग्लोबल वॉर्मिंगमुळे नष्ट होतायत अंटार्क्टिकावरील पेंग्विन; बर्फ वितळल्यामुळे लाखो नवजात पेंग्विन्सचा मृत्यू

Iraq: इराकमध्ये समलैंगिक संबंधाना गुन्हा ठरवणारा कायदा मंजूर; तब्बल इतक्या वर्षांचा होणार तुरुंगवास

SCROLL FOR NEXT