Jalgaon: The team of 'UMVI' qualified for the All India Tournament by winning the title of Western Divisional Cricket Tournament esakal
जळगाव

Jalgaon NMU News : उमवि क्रिकेट संघाला पश्चिम विभागीय विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : पंडित दीनदयाल उपाध्याय शेखावती विद्यापीठ, सिकर (राजस्थान) येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ क्रिकेट (पुरुष) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने उदयपूर विद्यापीठाच्या संघाचा पराभव करून विजेतेपद प्राप्त केले. आता हा संघ प्रथमच अखिल भारतीय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

कवय‍ित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने सलग सहा सामने जिंकून यश प्राप्त केले आहे. अंतिम सामन्यातील विजयामुळे कवय‍ित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा संघ आता अखिल भारतीय स्पर्धेसाठी पात्र ठरला.

प्रथम या प्रकारचे यश विद्यापीठाला मिळाले आहे. आता चार विभागांतील विजेत्या संघामध्ये सामने होऊन त्यातून बीसीसीआय आयोजित विझी ट्रॉफीसाठी संघ निवडण्यात येणार आहे. (Nmu Cricket Team West Division Champion Qualified for All India Tournament Jalgaon News)

अशी केली वाटचाल

विद्यापीठाच्या पहिला सामना भगवान महावीर विद्यापीठ (सुरत) यांच्याशी झाला. त्यात कबचौ उमविने ९ गडी राखून सामना जिंकला. तनिष जैन हा ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला. त्याने पाच विकेट मिळविल्या. दुसऱ्या सामन्यात नांदेड विद्यापीठाचा कबचौ उमवि संघाने १० गडी राखून पराभव केला. तिसऱ्या सामन्यात अहमदाबाद विद्यापीठाचा सहा विकेट राखून पराभव केला.

या सामन्यात २० षटकांत अहमदाबादने ५ गडी गमावून १५८ धावा केल्या, तर कबचौ उमवि संघाने ४ गडी गमावत निर्धारित लक्ष्य पूर्ण केले. संकेत पांडे याला सामनावीर किताब मिळाला. कोल्हापूर विद्यापीठासोबत झालेला सामना ८ गडी राखून जिंकला. तनिष जैन सामनावीर ठरला. नागपूर विद्यापीठासोबतचा सामना ७ गडी राखून कबचौ उमविने जिंकला. या सामन्यात शुभम शर्मा सामनावीर ठरला.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

अंतिम सामन्यात चुरस

अंतिम सामन्यात उदयपूर विद्यापीठाच्या संघाने २० षटकांत ८ गडी बाद १३१ धावा केल्या. तनिष जैन याने तीन विकेट घेतल्या. निर्धारित लक्ष कबचौ उमवि संघाने सहा गडी गमावून पूर्ण केले. चार गडी राखून अंतिम सामना कबचौ उमवि संघाने जिंकला.

शुभम शर्मा याने ३५ धावा केल्या, तसेच १ गडी बाद केला. त्यामुळे तो सामनावीर ठरला. या संपूर्ण सामन्यांत कर्णधार तुषार चोरडियाने १४२ धावा केल्या, तर तनिष जैन याने १७ गडी बाद केले.

संघ व्यवस्थापक म्हणून प्रा. सचिन झोपे, तर कोच म्हणून तनवीर अहमद संघासोबत होते. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील यांनी संघाचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nomination Rejection News : भावी नगरसेवकांसाठी आजचा गेमचेंजींग दिवस, महापालिका निवडणुकीसाठी छाननी होणार, कोणाचे अर्ज होणार अवैध

Vijay Hazare Trophy: नाशिकचा गोलंदाज इतिहास घडवतोय! 'अशी' कामगिरी करणारा महाराष्ट्राचा पहिला गोलंदाज ठरला

Latest Marathi News Update : किल्ल्यांवर 'थर्टी फर्स्ट'ला बंदी गैरप्रकार टाळण्यासाठी वन विभागाकडून गस्त,बंदोबस्तात वाढ

Pregnancy Criminalization Case : बाळाचा गर्भातच मृत्यू, महिलेला १८ वर्षांची शिक्षा, पण आता या एका दाव्याने निकाल पलटला; नेमकं काय घडलं?

Happy New Year 2026 Wishes: नववर्ष 2026 ची सुरुवात करा प्रेमाने! मित्र-परिवाराला पाठवा मनापासूनच्या शुभेच्छा, वर्ष होईल खास

SCROLL FOR NEXT