अमळनेर : एकही बस आगाराबाहेर जाऊ देणार नाही  sakal
जळगाव

अमळनेर : एकही बस आगाराबाहेर जाऊ देणार नाही

हृदयविकाराचा धक्का बसलेल्या चालकाच्या पत्नीची आक्रमक भूमिका

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : ‘माझ्या पतीची तब्येत बरी होत नाही, तोपर्यंत एकही बस आगाराबाहेर जाऊ देणार नाही’, अशी भूमिका मंगळवारी हृदयविकाराचा धक्का बसलेल्या चालकाच्या पत्नीने घेतल्यामुळे आगारातून एकच बस रवाना झाली आणि त्या बसवरही परत येताना रत्नापिंप्री येथे दगडफेक झाली.

जळगाव- अमळनेर बसचे चालक प्रवीण पाटील यांना मंगळवारी (ता. ७) बस चालवितानाच हृदयविकाराचा झटका आला होता. पहिल्याच दिवशी सहा फेऱ्या सुरू केल्या होत्या. प्रवीण पाटील यांनी कशीतरी बस अमळनेर आगारात आणल्यानंतर ते खाली उतरताच जमिनीवर पडले होते. त्यांना प्रशासनाने दवाखान्यात नेण्यासाठी बस दिली नाही आणि तातडीची मदत केली नाही म्हणून कर्मचारी नाराज होते.

आजारी प्रवीण पाटील यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांनी आक्रमक भूमिका घेत, ‘माझे पती बरे होऊन घरी येत नाही, तोपर्यंत एकही बस बाहेर जाऊ देणार नाही’, अशी भूमिका घेत बसला आडव्या झाल्या. आगारप्रमुख अर्चना भदाणे यांनी कामगारांचा रोष नको म्हणून सर्व बस आगारात जमा केल्या. वरिष्ठांकडून बस सुरू करण्याचा आग्रह आणि आदेश, तर कामगार व त्यांच्या कुटुंबीयांकडून विरोधामुळे भदाणे यांना मात्र त्रास सहन करावा लागला. त्यांनतर एकही बस गेली नाही. बसस्थानक परिसरात भाजपचे पदाधिकारीही मोठ्या संख्येने हजर होते.

दरम्यान, सकाळीच अमळनेरहून बस (एमएच ४०, एन ९०८२) पारोळ्याकडे रवाना करण्यात आली होती. पावणेबाराच्या सुमारास बस परत येताना रत्नपिंप्री गावाबाहेर तपोवनजवळ अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याने चालक रवींद्र सुरसिंग पाटील यांच्या हाताला दगड लागून जखम झाली. बसच्या काचा फुटल्या. त्यानंतर पारोळा पोलिसांना बोलाविण्यात आले. वाहक एस. एन. मोरे यांच्या सहकार्याने बस पारोळा पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Manager Work Pressure Death: खळबळजनक! बारामतीत 'Workload'मुळे बँक मॅनेजरने बँकेतच गळफास लावून दिला जीव

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरे दोन तास एकाच हॉटेलमध्ये; भेट झाली नसल्याची सूत्रांची माहिती

BMC Election: निवडणुकीनंतर 14 गावे बाहेर काढणार; गौप्यस्फोट करत वनमंत्र्यांनी यादीच दिली

Karad News : विधीमंडळातील मारामारीप्रकरणी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांचा थेट सरकारवर गंभीर आरोप, म्हणाले...

Rahul Gandhi: ''मोदीजी, 'त्या' पाच लढाऊ विमानांचं सत्य काय?'' राहुल गांधींकडून थेट निशाणा

SCROLL FOR NEXT