crop insurance sakal
जळगाव

केंद्राचा वाटा नाहीच; भरपाई मिळणार कशी?

विमा योजनेची भरपाई दिवाळीपूर्वी मिळणे धूसर

सकाळ वृत्तसेवा

रावेर : सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील केळी पीकविमा भरपाईचे पैसे मंजूर झाल्याचा दावा जरी लोकप्रतिनिधी करीत असले आणि त्याबाबतची श्रेय घेण्याची स्पर्धा सुरू असली तरीदेखील नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यासाठी आवश्यक असलेला केंद्र सरकारचा वाटा अद्याप विमा कंपनीला मिळाला नसल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. केंद्राचा वाटा मिळाल्यानंतर निधी मिळणार असल्याने दिवाळीपूर्वी ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.

सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील केळी विम्याच्या नुकसान भरपाईपोटी जिल्ह्यातील १२ हजार ८४७ विमाधारक शेतकऱ्यांना २८ कोटी ३ लाख रुपये मंजूर झाले असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. ही रक्कम मंजूर करण्यासाठी आपण पाठपुरावा केला असल्याचा दावा खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील यांनी आहे. मात्र, ही रक्कम दिवाळीपूर्वी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मिळणे शक्य नसल्याची प्रतिक्रिया एका अभ्यासू युवा केळी उत्पादक शेतकऱ्याने ‘सकाळ’कडे व्यक्त केली. ‘सकाळ’ने त्याबाबत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता केंद्र सरकारचा विमा रकमेचा वाटा कंपनीला अद्याप मिळाला नसल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

केंद्र सरकारचा हा वाटा मिळाल्यानंतर विमा कंपनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर भरपाईची रक्कम वर्ग करणार आहे. मात्र, केंद्र सरकारचा वाटा केव्हा येईल, हे निश्चित नसल्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी भरपाईची रक्कम येईल, ही शक्यता आता धूसर झाली आहे. लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून केंद्राचा विमा हफ्ता वाटा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी आता शेतकरी करीत आहेत.

विमा योजनेची सद्यःस्थिती

  • जिल्ह्यातील विमा योजनेतील सहभागी शेतकरी : ३४ हजार ४३

  • नुकसान भरपाईला पात्र शेतकरी : १२ हजार ८४७

  • मिळणारी नुकसान भरपाई : २८ कोटी ०३ लाख रुपये

  • विमा रकमेत शेतकऱ्यांचा हप्ता : ३४ कोटी ४ लाख रुपये

  • राज्य सरकारचा वाटा : ५९ कोटी ३८ लाख रुपये

  • केंद्र सरकारचा वाटा : ५१ कोटी ६५ लाख रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : सुनेने दाखल केलेल्या दाव्यातून वगळण्याचा माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्यासह इतरांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

जेवताना उचकी लागली, नंतर नाकातून रक्त आलं अन्...; कॉलेजमध्येच विद्यार्थिनीसोबत अघटीत घडलं

DK Shivakumar's Escort Car Overturns: मोठी बातमी! कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट कार महामार्गावर उलटली!

Latest Maharashtra News Updates : वडगाव येथे केळीच्या बागेत अर्भक सापडले

Narendra Modi: मोदींच्या सभेत महिलांचं 'खुर्ची युद्ध'! एकमेकींच्या डोक्यात घातल्या चेअर, Video Viral

SCROLL FOR NEXT