Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

जळगाव महापालिकेत कामात कसूर करणाऱ्या 41 कर्मचाऱ्यांना नोटीस

जळगाव महापालिकेत कामात कसूर करणाऱ्या 41 कर्मचाऱ्यांना नोटीस

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कामात कसूर करणाऱ्या मलेरिया विभागातील तिघांचे निलंबन करण्यात आले, तर ४१ कर्मचाऱ्यांना शोकॉज नोटीस बजावण्यात आली. बुधवारी (ता. ११) महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी ही कारवाई केली.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी अचानक कर्मचाऱ्यांचे हजेरीबुक मागविण्यात येत आहे. दिवसातून केव्हाही दोन वेळेस हजेरीबुक ताब्यात घेण्यात येत असून, ड्यूटीवर असताना गायब होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीसा बजाविण्यात येत आहेत. पहिल्याच दिवशी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर बसून उशिरा येणाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली होती. त्यानंतर अधूनमधून अचानक हजेरी बुक मागविण्यात येत आहेत. त्यामुळे कामावर हजेरी लावून गायब होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वचक निर्माण झाला आहे. असे असताना बुधवारी डॉ. विद्या गायकवाड यांनी अचानक सकाळी सहाला श्‍यामाप्रसाद मुखर्जी उद्यान, मलेरिया विभाग, पाणीपुरवठा युनिट व बांधकाम युनिटला भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांची तपासणी केली. या तपासणीदरम्यान हजेरी मस्टरवर तफावत आढळून आल्या. काही लोक हजेरी लावलेली असताना, गायब होते. तसेच काही लोकांकडून आपली जबाबदारी पार पाडली जात नसल्यामुळे मलेरीया विभागातील तीन जणांचे निलंबन करण्यात आले. यात मलेरिया विभागातील आरोग्य पर्यवेक्षक व दोन मजुरांचा सामावेश आहे. तसेच मलेरिया विभागप्रमुखांचे आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्यामुळे त्यांना नोटीस बजाविण्यात आली असून, इतर विविध विभागातील ४१ कर्मचाऱ्यांनाही नोटीस बजाविण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT