जिल्ह्यात रुग्ण घटले अन्‌ लसीकरणही मंदावले Media Gallery
जळगाव

जळगाव : जिल्ह्यात रुग्ण घटले अन्‌ लसीकरणही मंदावले

ओमिक्रॉनची भीती नाही; ७० टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला नाही

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता असताना नागरिक पहिला व दुसरा डोस घेत नसल्याचे चित्र आहे. नवीन प्रकारच्या कोरोनाचे रुग्ण आढळत नसल्याने नवीन कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही होत नाही. आतापर्यंत पहिली व दुसरी लस घेणाऱ्यांचे प्रमाण केवळ ३० टक्के आहे. पहिलीच लस न घेणाऱ्यांचे प्रमाण ७० टक्के आहे. कोरोनाची लागण होऊ नये यासाठी शासनाने नागरिकांना मोफत लस उपलब्ध करून दिली, असे असताना, नागरिक कोरोना प्रतिबंधक लस घेणे गांभीर्याने का घेत नाही, याबाबत वैद्यकीय क्षेत्रात विचारमंथन सुरू आहे.

कोरोना संसर्गाने गेल्या दोन वर्षांत तीन वेळा आपले रूप (व्हेरिएंट) बदलविले आहे. अजून किती काळ कोरोनाचे सावट असेल हे सांगता येत नाही. कोरोनावर लस घेणे हाच प्रतिबंधक उपाय आहे. तरीही नागरिक लसीकरणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आतापर्यंत झालेल्या लसीकरणावरून दिसत आहे. एकीकडे नागरिक स्वतःहून लसीकरणासाठी पुढे येत नाहीत.

जेव्हा कोरोनाची रुग्णसंख्या अधिक होती, तेव्हा लस केव्हा उपलब्ध होईल, असे चित्र होते. जेव्हा लस उपलब्ध झाली तेव्हा लस घेण्यासाठी पहाटे चारपासून रांगा लावणे, लसीकरणावरून भांडणे आदी प्रकार झाले. आता लस अगदी सहजपणे मिळत असताना लसीकरणासाठी कोणी पुढे येत नसल्याने जिल्हा प्रशासनाला लसीकरण प्रमाणपत्राशिवाय मॉलमध्ये प्रवेश नाही, रेल्वे, बसमध्ये प्रवेश नाकारला जातो. लस न घेणाऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ न देण्यापर्यंत निर्णय घेतला जात आहे. तरीही नागरिक लस घेत नाहीत.

रुग्ण सापडत नसल्याचे ट्रेसिंग नाही

जिल्ह्यात आरटीपीसीआर, ॲन्टिजेन टेस्टिंग चाचण्यांचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. याबाबत आरोग्य यंत्रणेला विचारणा केली असता जेव्हा रुग्ण आढळत होते तेव्हा त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री घेऊन रुग्णाच्या संपर्कातील २५ व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची चाचणी केली जात असे. आता मात्र रुग्णच सापडत नाही तर संशयित म्हणून कोणाची चाचणी करणार? यामुळे चाचण्या कमी होत आहेत, असे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

शाहरुखने खरेदी केलं दिल्लीतील 'ते' घर, जिथं किंग खानने गौरीसोबत अनुभवला स्ट्रगल काळ, कोट्यवधींमध्ये झाली डील

Latest Marathi News Update : फिरोज शेख यांचे मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी आरोप फेटाळले

Seema Kohali: सीमा कोहली; स्थलांतर, स्मृती आणि आध्यात्मिकतेतून घडलेले सीमाचे कलाविश्व

Iran US War : खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणमध्ये कोण चालवतंय सरकार? अमेरिकेलाही मिळतंय चोख प्रत्युत्तर...

SCROLL FOR NEXT