number of women voters in district increased by 22 thousand jalgaon news 
जळगाव

Jalgaon New Voter: जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या 22 हजारांनी वाढली; जनजागृतीचा परिणाम

जिल्हा निवडणूक विभागाने मतदार नोंदणीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे जिल्ह्यातील महिला मतदारांची संख्या पुरूषांच्या तुलनेत वाढली आहे

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon New Voter: जिल्हा निवडणूक विभागाने मतदार नोंदणीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे जिल्ह्यातील महिला मतदारांची संख्या पुरूषांच्या तुलनेत वाढली आहे. जिल्ह्यात १६ लाख ५७ हजार ७६ महिला मतदार संख्या होती.

२७ ऑक्टोबर ते २४ डिसेंबर २०२३ या दोन महिन्यांतील विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मतदार नोंदणी कार्यक्रमातील आकडेवारीनुसार जिल्ह्यात महिला मतदारांमध्ये २२ हजार ६८१ ने वाढ झाली आहे. (number of women voters in district increased by 22 thousand jalgaon news)

आता जिल्ह्यात १६ लाख ७९ हजार ७६७ मतदार झाले आहेत‌. तर याच कालावधीत पुरूष मतदारांमध्ये ४४ हजार २८० ने वाढ झाली आहे. पुरूष मतदारांमागे महिला मतदारांची सरासरीत ४ ने वाढ होत ९२१ वरून ९२५ इतकी सरासरी झाली आहे.

जनजागृतीचा परिणाम

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी मागील काही महिन्यात महिला मतदारांची संख्या वाढविण्यासाठी विविध उपक्रम व शिबिरांचे आयोजन केले. गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात मतदार नोंदणीबाबत जनजागृती करण्यात आली‌.

आदिवासी भागात मोहीम

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त दुर्गम अशा सातपुड्याच्या आदिवासी भागात जनजागृती करण्यात आली. जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये नवमतदारांसाठी शिबिरांचे वेळोवेळी आयोजन करण्यात आले. १ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर कालावधीत ग्रामसभांमध्ये जनजागृती करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात १८ वर्षापूढील नवमतदारांसाठी नोव्हेंबर २०२३ या महिन्यात चार विशेष शिबिर घेण्यात आली.

पाच शहरांत सर्वाधिक वाढ

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमानुसार भुसावळ, जळगाव शहर, एरंडोल, चाळीसगाव व जामनेर शहरात सर्वाधिक महिला मतदार वाढले आहेत. जळगाव शहरात २ हजार ७९२ , भुसावळ २ हजार ५२८, एरंडोल २ हजार २२४, चाळीसगाव २ हजार ३२२ व जामनेर २ हजार २१८ महिला मतदार वाढले आहेत. याखालोखाल चोपडा, जळगाव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, पाचोरा व मुक्ताईनगर या मतदार संघाचा नंबर लागतो.‌

तृतीयपंथी मतदार वाढले

जिल्ह्यात २ व‌ ३ डिसेंबर रोजी तृतीयपंथीय व्यक्तींसाठी मतदार नोंदणीचे विशेष शिबीरे घेण्यात आली. यामुळे तृतीयपंथीय मतदारांची संख्याही ८ मतदारांनी वाढली आहे. ५ जानेवारी २०२३ रोजी जिल्ह्यात १२३ तृतीयपंथीय मतदार होते. आता १३१ तृतीयपंथीय मतदार आहेत. भुसावळ, जळगाव शहर व चाळीसगाव मध्ये सर्वाधिक तृतीयपंथीय मतदार आहेत.

"राज्यात नऊ डिसेंबरला मतदार नोंदणी मुदत संपली आहे. मात्र, निवडणूक आयोगाने नऊ डिसेंबरनंतरही मतदार नोंदणीची संधी दिली आहे. यासाठी अर्ज ऑनलाइन, ऑफलाइन भरता येणार आहेत.जास्तीत जास्त नवमतदारांनी ऑफलाईन किंवा व्होटर रजिस्टर अॅपच्या मदतीने लवकरात लवकर नोंदणी करावी." - आयुष प्रसाद जिल्हाधिकारी, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT