blackmailing  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : विद्यार्थिनीच्या मॉर्फिंग फोटोच्या आाधारे ब्लॅकमेलिंग; फोटो व्हायरलची धमकी

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शिरसोली रोडवरील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला वसतिगृहातून काढले नाही, तर तिचा अश्‍लील फोटो व्हायरल करण्याची धमकी वसतिगृहाच्या रेक्टरला (Rector) देण्यात आली. (Obscene morphing photo viral threat to remove girl from hostel jalgaon crime news)

त्याचबरोबर अश्‍लील फोटो पाठवून विनयभंग केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयात २२ वर्षीय विद्यार्थिनी कॉम्प्युटर सायन्सच्या तृतीय वर्षाचे शिक्षण घेत असून, ती महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहते. २२ मार्चला वसतिगृहाच्या रेक्टर यांच्या व्हॉट्‌सॲपवर एका अनोळखी क्रमांकावरून विद्यार्थिनीचा मॉर्फिंग केलेला अश्‍लील फोटो पाठविण्यात आला.

त्यात विद्यार्थिनीबद्दल बदनामीकारक मजकूर लिहिला असून, विद्यार्थिनीला वसतिगृहातून काढून टाकावे नाही, तर फोटो व्हायरल करण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली. हा प्रकार वसतिगृहाच्या रेक्टरने विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना कळविला.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

विद्यार्थिनी बाहेरगावाहून घरी आल्यानंतर कुटुंबीयांनी घडलेला प्रकार तिला सांगितला. फोटो पाहिल्यानंतर तो फोटो कुणीतरी मॉर्फिंग केला असल्याचे तिने कुटुंबीयांना पटवून दिले. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT