Jalgaon News : बऱ्हाणपूर - अंकलेश्वर महामार्गावर सावदा शहरानजीक रस्त्यावरील दुभाजकासाठी सोडण्यात आलेल्या जागेच्या दुरुस्तीबाबत शासनाच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी करून एकमेकांकडे बोट दाखवले आहे.
परंतु इकडे मात्र रोज वाहने घसरण्याच्या घटना घडत असून, वाहनधारकांचा जीव टांगणीला लागला आहे.(Officials point fingers at each other regarding highway repairs jalgaon news)
या रस्त्याच्या दुरुस्तीकडे राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण असेल या दोन्ही विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्षच केले असून, याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून टोलवाटोलवी केली जात असून, एकमेकांकडे बोट दाखविले जात आहे. मात्र हा रस्ता वाहनधारकांच्या मानगुटीवर बसला आहे.
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सावदा कार्यकारी अभियंता व्ही. के. तायडे यांच्याशी संपर्क साधला असता आता हा रस्ता आमच्या कार्यक्षेत्रात राहिलेला नसल्याने त्याच्या दुरुस्तीबाबत आम्ही काहीही उपाययोजना करू शकत नाही. तर याबाबत त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे बोट दाखविले.
तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता चंदन गायकवाड यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितले, की पाल- आमोदा हा महामार्ग आमच्या कार्यकाळात तयार झालेला नसून तो ज्या विभागाने अर्थात सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केला आहे, त्यामुळे त्या रस्त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी ही त्यांची आहे.
या रस्त्याच्या देखभालीची दुरुस्तीची जबाबदारी जर संबंधित ठेकेदारावर अद्यापही असेल तर ती त्यांनी करायचे आहे. किंवा ती मुदत संपली असेल तर मग काय उपाययोजना करता येतील, ते आम्ही बघू असे अभियंता चंदन गायकवाड यांनी सांगितले. त्यामुळे दाद मागावी कुणाकडे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
...आश्वासने विरली हवेतच
अधिकाऱ्यांच्या एकमेकांकडे बोट दाखविण्याच्या प्रकारामुळे असे लक्षात येते आणि प्रश्न पडतो की संबंधित विभाग हे तांत्रिक कारणे पुढे करून टोलवाटोलवी तर करत नाही ना? इकडे मात्र वाहने घसरून होणाऱ्या अपघातांमुळे लोकांचे जीव धोक्यात आहे. जर या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत दोन्ही विभागांना कामच करायचे न होते तर मग त्यांनी आश्वासन देऊन ताप्ती सातपुडा फाउंडेशनचे उपोषण सोडण्यास पुढाकार का घेतला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.