Jalgaon Crime News psl98 esakal
जळगाव

Jalgaon : कृष्णापूर तांड्यात एकाला बेदम मारहाण; 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव (जि. जळगाव) : रस्त्यावरील ट्रॅक्टर बाजूला घेण्याबाबत सांगितल्याचा राग येऊन एकाने डोक्यात रॉडने मारहाण (Beating) करून गंभीर दुखापत (Serious Injured) केल्याची थरारक घटना तालुक्यातील कृष्णापूर तांडा (तळेगाव) येथे रविवार, ता. ८ मे रोजी रात्री ९:३० वाजता घडली होती. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (One beaten to death in Krishnapur Tanda Charges filed against 4 Jalgaon Crime News)

याबाबत सविस्तर वृत्त, तालुक्यातील कृष्णापूर तांडा (तळेगाव) येथील उमेश रमेश चव्हाण (वय-२७) हा वरील ठिकाणी परिवारासह वास्तव्यास आहे. चव्हाण यांच्या घरी रविवार, ता. ८ मे रोजी रात्री ९:३० वाजता जाऊळचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तेव्हा शेजारी राहणारे काका धोंडीराम भिका चव्हाण यांनी घरासमोरील मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टर व खाट टाकलेली होती. त्यावर उमेश यांनी घरी कार्यक्रम आहे. यामुळे आपण ट्रॅक्टर व खाट बाजूला करण्याविषयी सांगितले. त्याचाच राग आल्याने त्यांनी शिवीगाळ करून मारायला सुरुवात केली. वडील रमेश भिका चव्हाण यांनी मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तान्हाजी धोंडीराम चव्हाण व कैलास लक्ष्मण राठोड यांनी रमेश भिका चव्हाण यांना चापट बुक्क्यांनी मारहाण केली.

तर प्रविण धोंडीराम चव्हाण व धोंडीराम भिका चव्हाण या दोघांनी शिवीगाळ करून रमेश चव्हाण यांना जमिनीवर खाली पाडून पकडून ठेवले. तेवढ्यात कैलास लक्ष्मण राठोड यांनी त्याचे हातातील लोखंडी रॉडने डोक्यात मारून चव्हाणांना गंभीर दुखापत केली व आमच्या नादी लागल्यास जिवे ठार मारू अशी धमकी धोंडीराम भिका चव्हाण यांनी दिली. दरम्यान या वादात रमेश चव्हाण यांना गंभीर दुखापती झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेप्रकरणी उमेश रमेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात भादवी कलम- ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे तान्हाजी धोंडीराम चव्हाण, प्रविण धोंडीराम चव्हाण, धोंडीराम भिका चव्हाण तिन्ही रा. कृष्णानगर तांडा ता. चाळीसगाव व कैलास लक्ष्मण राठोड रा. करगांव तांडा नं. ३ ता. चाळीसगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT