drowning death esakal
जळगाव

Jalgaon News: 4 मित्र अंघोळीला गेली... एकाचा बुडून मृत्यू; मेहरुण तलावात घडला अनर्थ

मेहरुण तलावामध्ये अंघोळीसाठी गेलेल्या शाहूनगर परिसरातील तेरावर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : मेहरुण तलावामध्ये अंघोळीसाठी गेलेल्या शाहूनगर परिसरातील तेरावर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. चार मित्र तलावात अंघोळीसाठी गेले असता, चारही गटांगळ्या खाऊ लागल्यानंतर तेथील तरुणांनी उडी घेत तिघांना वाचविले. शुक्रवारी (ता. २९) दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली.

ईशान शेख वसीम (वय १३, रा. शाहूनगर) असे मृत मुलाचे नाव आहे. घटनेनंतर तलाव परिसर, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गर्दी झाली होती. (One died by drowning in mehrun lake jalgaon news)

शाहूनगर परिसरात राहणारे ईशान शेख, मोईन खान अमीन खान (१३), अयान तस्लिम भिस्ती (१३) व अस्लम शेख सलाउद्दीन (१३, सर्व रा. शाहूनगर, जळगाव) हे चौघे शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास मेहरुण तलाव परिसरात अंघोळीसाठी गेले. चौघेही पाण्यात उतरले व काही वेळातच ते गटांगळ्या खाऊ लागले.

वाचविण्याचा प्रयत्न

हा प्रकार आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आला. त्या वेळी ते मदतीसाठी धावले. यातील मोईन खान, अयान भिस्ती व अस्लम शेख हे तिघे जण लवकर हाती लागले. त्यांना बाहेर काढून त्यांच्या पोटातून पाणी काढण्यात आले. त्यानंतर ईशान सापडला. चौघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. तेथे ईशान याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर चारही मुलांचे नातेवाईक व परिसरातील नागरिक मेहरुण तलाव परिसर व रुग्णालयात पोचले होते. त्यामुळे दोन्ही ठिकाणी गर्दी झाली होती. तसेच ईशानच्या मृत्यूची वार्ता कानी पडताच नातेवाइकांनी मोठा आक्रोश केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्यासह त्यांचे सहकारी घटनास्थळी व रुग्णालयात पोचले.

ईशानचे वडील पेंटर

मृत ईशानचे वडील पेंटर असून, आई गृहिणी आहे. शेख दांपत्याला दोन मुली असून, ईशान हा एकुलता एक मुलगा होता. शेख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Crime News: चिमुकलीवर लैंगिक अत्याचार व खून प्रकरणी ६५ वर्षीय आरोपीला ७ मे पर्यंत पोलिस कोठडी

CSK vs MI Live: मुंबई इंडियन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड! चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ढेपाळले, पण जगात चमकले; भारतीय संघालाही हे नाही जमले...

Success Story : जिद्दीला सलाम! दोन मुलांचा सांभाळ अन् मोलमजुरी करत निशाने केली 12वी उत्तीर्ण; मिळवले ६८.३३% गुण

Judge Suicide: धक्कादायक! न्यायाधीशांनी जीवन संपवलं; मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, घटनेनं खळबळ

Yerla River Incident : लग्नासाठी आली अन् काळानं घाला घातला! येरळा नदीत पोहण्यास गेलेल्या 20 वर्षीय तरुणीचा बुडून मृत्यू; सात मुलांना पाण्याबाहेर काढण्यात यश

SCROLL FOR NEXT