crime  esakal
जळगाव

Jalgaon Accident News : सांगवी फाट्याजवळ अपघातात एक ठार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील सांगवी फाट्यासमोर कार व मोटरसायकलच्या अपघातात एकजण ठार झाला. विशाल देवीदास पाटील (वय ४०, रा. एरंडोल) असे त्यांचे नाव आहे.( One killed in accident near Sangvi Phata jalgaon accident news)

एरंडोल येथील हॉटेल नॅशनल पंजाबमध्ये व्यवस्थापक म्हणून कामास असलेले विशाल हे शनिवारी (ता. २८) सायंकाळी पारोळाकडून एरंडोलकडे मोटरसायकलवरुन (एम. एच. १५ डीटी ३४३१) निघाले होते. त्यावेळी इंडिका कारने (एम. एच. १९ एएक्स ४९७९) धडक दिली. त्यात विशाल गंभीर जखमी झाले.

त्यांना एका खासगी वाहनातून पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कुटीर रुग्णालयातून त्यांना प्राथमिक उपचार करून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने शहरातील खासगी रुग्णालयात सायंकाळी सहाला दाखल करण्यात आले. रात्री बाराला त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याबाबत पारोळा पोलिसात चंद्रकांत नाना पाटील राहणार मोंढाळे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक उपनिरीक्षक किशोर पाटील हे तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur News: श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे उद्यापासून २४ तास दर्शन, ६ किमीपर्यंत दर्शनरांग; आषाढीसाठी खास व्यवस्था

Petrol-Diesel Price: 15 जुलैचे नवे दर जाहीर! कच्चे तेल 15 डॉलरने महागल्यानंतर मुंबई-पुण्यात पेट्रोल-डिझेल आता कितीला?

आजचे पंचांग १५ जुलै २०२६! चंद्रदर्शन, शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि संपूर्ण दिनविशेष

Latest Marathi News Update : पनवेल-जेएनपीटी मार्गावर उड्डाणपुलाचा गर्डर कारवर कोसळला

Maharashtra Farmers: पेरलं, पण उगवलंच नाही! बोगस सोयाबीन बियाण्यांनी हजारो शेतकरी अडचणीत

SCROLL FOR NEXT