online fraud
online fraud sakal media
जळगाव

जळगाव : ॲप डाउनलोड करण्याचे सांगत सव्वा लाख लंपास

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मोबाईल क्रमांकाची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासह ॲप डाऊनलोड करण्याचे सांगत महाबळ परिसरातील इसमाला सव्वालाखात फसविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरुवारी (ता. २४) राहुल अग्रवाल नामक व्यक्तीविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नरेश भगवान गाजरे (वय ५५) हे पत्नी व मुलगा लोकेश यांच्यासह वास्तव्याला असून खासगी वॉटर सप्लायचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. २१ फेब्रुवारीला दुपारी १ वाजेच्या सुमारास नरेश गाजरे यांच्या मोबाईलवर मेसेज आला. त्यात सिमकार्डचे केवायसी बाकी आहे, २४ तासाच्या आत कागदपत्र जमा करावे, असा संदेश देत एका नंबरवर कॉल करण्याचे सांगितले. त्यानुसार नरेश गाजरे यांनी दिलेल्या नंबरवर कॉल केला असता समोरील व्यक्तीने राहुल अग्रवाल असे नाव व वोडाफोन केअरमधून बोलत असल्याचे सांगितले. नंबर सुरू ठेवण्यासाठी १० रुपयांचा रिचार्ज करून केवायसी अपडेट करावी लागेल असे सांगितले.

नरेश यांचा साधा मोबाईल असल्याने त्यांनी मुलगा लोकेशला सांगितले. लोकेशने समोरील व्यक्तीच्या दिलेल्या माहितीप्रमाणे ‘यु मोबाईल ॲप’ डाऊनलोड केले आणि दिलेल्या ॲपमध्ये डेबिट कार्डची माहिती भरली. त्यावरून लोकेशने १० रुपयाचा रिचार्ज केला. त्यानंतर पुन्हा त्याच नंबरवरून फोन आला, त्याद्वारे एनीडेक्स, ऑटोमेटिक एसएमएस सेंड टू पीसी आणि केवायसी क्वीक डॉक्युमेंट हे तीन ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार लोकेशने सांगितलेली तीनही ॲप डाऊनलोड करून दोघांच्या बॅंकेचे डिटेल्स भरले. डिटेल भरल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच दोघांच्या बँक अकाउंटमधून अनुक्रमे लोकेशच्या खात्यातून ६८ हजार २३४ तर नरेश गाजरे यांच्या खात्यातून ४८ हजार १८४ रुपये असे एकूण १ लाख १६ हजार ४२८ रुपये कमी झाल्याचे लक्षात आले.

दोघांनी तातडीने बँकेत धाव घेऊन दोन्ही अकाउंट बंद केलेत. यासंदर्भात नरेश गाजरे यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय शिंदे करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT