Jilha Parishad News
Jilha Parishad News esakal
जळगाव

Jalgaon News : जिल्हा नियोजन समितीच्या खर्चाचे आतापर्यंत केवळ 23 टक्के खर्च

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्हा नियोजन समितीद्वारे विविध यंत्रणांना दिलेल्या निधीपैकी केवळ २३.१० टक्के खर्च झाला आहे. ७४ टक्के खर्च मार्च अखेरपर्यंत करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

राज्य शासनाकडून जिल्हा विकास योजनांतर्गत जिल्हा नियोजन बैठकीत नियोजन, मागणीनुसार निधीचे वितरण केले जाते.

शासनाने वितरित केलेल्या निधीद्वारा राज्यातील जिल्हा नियोजन समित्यांपैकी जिल्हा नियोजन अंतर्गत प्राप्त निधी खर्च करण्यात जळगाव जिल्हा नियोजनाचा पाचवा क्रमांक आहे. (Only 23 percent of District Planning Committee expenditure so far Jalgaon News)

जिल्हा नियोजन समितीच्या २०२२-२३ साठी झालेल्या बैठकीत ४५२ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीत तरतूद करण्यात आली होती. मार्चच्या अर्थसंकल्पात १ एप्रिलपासून विविध योजनांसाठी निधी दिला होता.

या निधीच्या खर्चास जूननंतर सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस शासनाने जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) अंतर्गत तत्कालीन महाविकास आघाडी शासनाच्या काळात प्रशासकीय मान्यतांना स्थगिती दिली होती. जूननंतर सत्तेवर आलेल्या शासनातर्फे पालकमंत्र्यांची नियुक्ती झाल्यानंतर सात महिन्यांनंतर जिल्हा नियोजन समितीच्या कामांवरील स्थगिती उठविली.

आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

त्यामुळे जिल्हा नियोजन अंतर्गत प्राप्त झालेल्या निधी खर्चास विलंब लागला. दरम्यानच्या काळात ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, सद्यस्थितीत नाशिक पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन अंतर्गत निधी वितरित करण्यास अडचणी येत आहेत.

केवळ १०४ कोटी खर्च

जळगाव जिल्हा नियोजनच्या अर्थसंकल्पीय ४५२ कोटी रुपयांपैकी शासन स्तरावरून २७२ कोटी २५ लाख २९ हजार रुपयांचा निधी जिल्ह्याला देण्यात आला होता. त्यातील ११३ कोटी ६९ लाख ६३ हजार रुपयांचा निधी डीपीसीने शासकीय यंत्रणांना वितरित केला होता. या वितरित तरतुदींपैकी आतापर्यंत १०४ कोटी ४० लाख ४६ हजार रुपयांचा निधी विकासकामांवर खर्च झाला आहे. एकूण वितरित निधीपैकी खर्चाचे प्रमाण २३.१० टक्के आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT