Railway Ticket Inspector while raising awareness among the passengers about ‘UTS’ app esakal
जळगाव

Jalgaon : 2 हजारांवर रेल्वेचे जनरल तिकीट UTS APP डाउनलोड

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ‘यूटीएस’ (अनारक्षित तिकीट बुकिंग सुविधा) रेल्वे ॲपद्वारे (App) जनरल तिकीट (General Ticket) भुसावळ विभागातील सर्व स्थानकांवर अनारक्षित (reserved) तिकिटे देण्यात येत आहेत. एका दिवसात दोन हजार दोनशे तीन रेल्वे प्रवाशांनी रेल्वेचे जनरल तिकीट अॅप डाउनलोड केले आहे. (Over 2000 train general tickets UTS APP download jalgaon Latest Marathi News)

भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. एस. केडिया यांच्या अध्यक्षतेखाली, मुख्य विभागीय वाणिज्य व्यवस्थापक शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, भुसावळ विभागाचे वाणिज्य निरीक्षक आणि तिकीट निरीक्षक यांनीही भुसावळ विभागात २७ टीम तयार केल्या आहेत.
त्यांनी भुसावळ ते इगतपुरी, अमरावती ते भुसावळ, खांडवा-भुसावळ, चाळीसगाव-धुळे, जलंब-खामगाव विभागाची एकदिवसीय जनरल तिकीट अॅप प्रचार मोहीम यशस्वी केली.

तिकीट तपासनीस आणि कमर्शिअल इन्स्पेक्टर यांची एक संयुक्त टीम तयार करण्यात आली. सुमारे नऊ हजार जणांची बढती करण्यात आली. भुसावळ-इगतपुरी मेमू, भुसावळ-बडनेरा मेमू आणि भुसावळ-खांडवा या गाड्यांना भेट देऊन प्रमोशन केले. शाळा, महाविद्यालयांत जाऊन यूटीएस अॅपचे महत्त्व सांगून अॅप डाउनलोड करून घेतले.

भुसावळ मंडळाच्या सीसीआय, सीटीआय, सीबीएस, वाणिज्य विभागातील कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण करून एका दिवसात दोन हजार २०३ अॅप डाउनलोड केले.

यूटीएस’ॲपद्वारे जनरल तिकीट
भुसावळ विभागातील सर्व स्थानकांवर अनारक्षित तिकिटे देण्यात येतील. अनारक्षित तिकीट बुकिंग सुविधा रेल्वे प्रशासनाद्वारे काही निवडक स्थानकांवर एटीव्हीएम आणि यूटीएस ॲपद्वारे प्रवासी आपले तिकीट बुक करू शकतात. या सुविधांमुळे त्यांचा वेळ वाचण्यात मदत होत आहे. गर्दीत उभे राहून वेळ घालविण्यापेक्षा प्रवाशांना आता ॲपद्वारे जनरल तिकीट काढता येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trending News : AI ची कमाल ! महिलेला मिळाला २५ वर्षांपूर्वी गेलेला आवाज, नेमका कसा घडला चमत्कार?

Joint Pain: पावसाळ्यात सांधेदुखी का वाढते? जाणून घ्या उपचार कसे करावे

Latest Marathi News Updates : जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी एक क्विंटलचा फुलांचा हार

Online Shopping Discount : कपडे अन् इतर वस्तू सगळ्यात स्वस्त कुठे मिळतात? तुमच्याचं फायद्याचं आहे, पाहा एका क्लिकवर..

Crime News : हुंड्यासाठी पत्नीला मुलासमोर जिवंत जाळलं, पतीचा एन्काउंटर; पोलिसांनी झाडली गोळी

SCROLL FOR NEXT