Jalgaon News esakal
जळगाव

Jalgaon News: थकबाकीदारांच्या घरासमोर बडविला ढोल; करवसुलीसाठी प्रशासक उतरले रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा : येथील पालिकेच्या विविध करवसुलीसाठी प्रशासक शोभा बाविस्कर यांच्यासह पालिकेचे वसुली पथक ॲक्शन मोडवर आले असून, थकबाकीदारांची घरे व दुकानांसमोर ढोल-ताशे वाजवत पालिकेने सोमवारी (ता. २०) एकोणीस गाळे सील केले. यामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.

प्रशासक शोभा बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकदा सूचना, नोटीसा देऊन जनजागृती करून देखील थकबाकी वसुली होत नसल्याने सोमवारी (ता. २०) धडक मोहीम राबवून शहरातील नवकार प्लाझामधील १९ व्यापारी गाळे सील करण्यात आले आहेत.

तसेच शहरातील ज्या थकित मालमत्ताधारकांनी त्यांच्याकडे असलेली थकबाकी भरलेली नाही, अशा थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल ताशे वाजवून वसुलीची कार्यवाही सुरू आहे. नळपट्टी थकित प्रकरणी नळसंकुल बंद करण्यात येत असून, मालमत्ताजप्तीची कार्यवाही देखील होत आहे.

जागा व गाळाभाडे थकबाकीधारकांनी थकित कर व भाडे त्वरित भरावे व कटू प्रसंग टाळण्याचे आवाहन प्रशासक शोभा बाविस्कर यांनी केले आहे.

हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

या धडक मोहिमेत शोभा बाविस्कर, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, करअधीक्षक साईदास जाधव, अभियंता मधुकर सूर्यवंशी, लेखापाल संजय बाणाईत, दत्तात्रय जाधव, लेखापरीक्षक नितीन लोखंडे, लिपीक भिकन गायकवाड, विशाल मराठे, नरेश आदिवाल, युसूफ अजीज खान, फिरोज पठाण, संदीप खैरनार, विलास कुंभार, भिकन गायकवाड, किशोर मराठे, विलास कुलकर्णी, दत्तात्रय पाटील, अनिल वाघ, आबा पाटील आदींचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT